ह. भ. प. पंढरीनाथ महाराज राजगुरू यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर;

विश्वकर्मा वंशीय समाजातर्फे सत्कार

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा प्रख्यात कीर्तनकार ह. भ. प. पंढरीनाथ महाराज राजगुरू यांना विश्वकर्मा वंशीय समाजाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. २८ जून २०२६ रोजी श्रीक्षेत्र शिर्डी येथे आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या गौरवपूर्ण निवडीबद्दल जामखेड येथील विश्वकर्मा वंशीय समाजाच्या वतीने पंढरीनाथ महाराज राजगुरू यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी समाजबांधवांनी त्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले तसेच आगामी काळातील सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंढरीनाथ महाराज राजगुरू यांनी अनेक वर्षांपासून अध्यात्म, समाजप्रबोधन, संस्कार व भक्तीपर परंपरेच्या जतनासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत विश्वकर्मा वंशीय समाजाने त्यांची ‘समाजरत्न’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जामखेड तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सत्कार समारंभ प्रसंगी समाजातील विविध मान्यवरांनी पंढरीनाथ महाराज यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाजातील अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही त्यांच्या हातून समाजोपयोगी कार्य घडत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी विश्वकर्मा वंशीय समाजाचे अध्यक्ष आनंद राजगुरू, संजय बनगे, गणेश सुतार, गणेश आळजापूरकर, डी. के. मिस्तरी, सतीश राजगुरू, नारायण राजगुरू यांच्यासह समाजाचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंढरीनाथ महाराज राजगुरू यांना जाहीर झालेल्या ‘समाजरत्न’ पुरस्काराबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here