

राजवीर नवनाथ खोत BTS परीक्षेत राज्यात प्रथम
गितेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड
जामखेड प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी राजवीर नवनाथ खोत या विद्यार्थ्याची इसरो सहलीसाठी निवड झाली आहे. भारत टॅलेंट सर्च BTS परीक्षेत 150 पैकी 148 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला म्हणून त्याची निवड इसरो सहलीसाठी झाली आहे.

राजवीर खोत यास सहलीत मोफत विमान प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. एवढ्या कमी वयात विमान प्रवास करणारा विद्यार्थी म्हणून परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. भारतीय टॅलेंट सर्च (BTS) या स्पर्धा परीक्षेत राजवीरने 150 पैकी 148 गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तो शांत, संयमी व अभ्यासू विद्यार्थी असून. अनेक स्पर्धा परीक्षेत राजवीर ने उत्तम कामगीरी केली आहे. हिंद सेवा मंडळ परीक्षेत 300 पैकी 274 गुण, आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत 200 पैकी 170 गुण, लक्षवेध परीक्षेत 300 पैकी 282 गुण मिळविले आहेत. तसेच राजवीर इ. दुसरीमध्ये असताना मंथन व अक्षरगंगा या दोन्ही स्पर्धा परीक्षेत त्याने 150 पैकी 150 गुण घेऊन राजवीरने महाराष्ट्रतून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

स्पर्धा परीक्षेतील त्याची तयारी उत्तम असून सातत्य, जिद्द , चिकाटी याच्या साथीला वर्गशिक्षक तथा स्पर्धा परीक्षेतील गुणवंत शिक्षक, चंद्रकांत अरण्ये सर यांचे अचूक मार्गदर्शन याच्या जोरावर राजवीरने हे उत्तुंग यश मिळविले आहे. भारत टॅलेंट सर्च परीक्षेतून महाराष्ट्रातून १ ली ते ८ वी च्या प्रत्येक इयत्तेतील प्रथम तीन क्रमांक मिळवणार्या गुणवंतांना इस्रो येथे विमान प्रवासाची अनोखी संधी मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तिसरी इयत्तेतून राजवीर हा एकमेव विद्यार्थी विमानातील सफर अनुभवणार आहे. लहान वयात राजवीरने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल राजवीरचे विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. याच बरोबर शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा घवघवीत यश संपादन केले आहे.

गुणवंत विद्यार्थी शिवराज अशोक जाधव या विद्यार्थ्याने 150 पैकी 142 गुण मिळवून राज्यात सहावा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळबला आहे. शशांक शरद पाचारणे 134 गुण जिल्हात चौथा, रुद्र राजाभाऊ राठोड 134 गुण जिल्ह्यात चौथा, कार्तिक रामचंद्र पाचरणे 134 गुण जिल्ह्यात चौथा, अथर्व पांडुरंग सपकळ 132 गुण जिल्ह्यात आठवा, आर्यन अमोल तंटक 124 गुण जिल्ह्यात सोळावा, समर्थ रोहित वायचळ 116 गुण, अर्णव मुकुंद लांडगे 116 गुण, आरव सुनील भंडारी, अथर्व सुरज जगताप, आदित्य हौसराव कण्हेरकर , उत्कर्ष उमेश धोकटे, अभय अनिल होडशिळ , अभिनव विनोद गोलेकर, आदर्श कालिदास सुर्वे या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.

इयत्ता दुसरीतील चाणाक्ष विद्यार्थीनी रुत्वी रवींद्र धस हिने 150 पैकी 142 गुण मिळवून राज्यात 17 वा , जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला आहे. आरती अर्जुन होडशिळ हिने 82 गुण मिळवून केंद्रात दहावा क्रमांक मिळवला आहे. इयत्ता चौथीतील विद्यार्थी ओंकार राजेश होडशिळ याने 80 गुण मिळवून केंद्रात तेवीसावा क्रमांक मिळवला आहे

आदर्श शिक्षक चंद्रकांत अरण्ये सर आणि पालवे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले आहे.
या उत्तुंग यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या यशाबद्दल माननीय गटशिक्षणाधिकारी धनंजय बोदार्डे, विस्तार अधिकारी अशोक आंधळे, जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश होडशिळ , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कुंडलिक गिते व सर्व ग्रामस्थ यांनी भरभरून कौतुक केले आहे.




