Home ताज्या बातम्या जामखेडच्या पाच वर्षीय चिमुकलीचाही सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

जामखेडच्या पाच वर्षीय चिमुकलीचाही सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

जामखेडच्या पाच वर्षीय चिमुकलीचाही सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

शहरातील खर्डा चौक याठिकाणी हातात फ्लेक्स घेऊन दिला जाहीर पाठींबा

जामखेड प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असून आता या आंदोलनात लहान मुलांचाही सहभाग दिसून येत आहे. जामखेडच्या अबिरा बाळासाहेब घोडेस्वार, वय.५ वर्ष, रा. श्री नागेश विद्यालय पाठीमागे या चिमुकलीने शहरातील खर्डा चौक येथे उभे राहून हातामध्ये फ्लेक्स घेऊन या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे. तिच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे.

चिमुकलीच्या हातातील फलकावर “I Support Sonam Wangchuk Sir, कारण माझं भविष्य धोक्यात आहे” असा संदेश लिहिण्यात आला आहे. तसेच “मी आज रस्त्यावर उभी आहे, कारण माझे उद्याचे भविष्य सुरक्षित असावे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका.” अशी भावनिक भूमिका अबिरा हीने मांडली आहे. या संदेशामुळे अनेक नागरिकांच्या भावना व्यक्त होत असून सोशल मीडियावर या छायाचित्राला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

देशातील शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला जावा, अशी भावना या चिमुकलीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. एवढ्या लहान वयात सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता दाखवल्याबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, नागरिक आणि विविध स्तरांतून पाठिंबा वाढत असून, आता चिमुकल्यांचाही सहभाग दिसून येत असल्याने या आंदोलनाला एक वेगळे भावनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. जामखेड शहरातील खर्डा चौक याठिकाणी हातात फ्लेक्स घेऊन उभे रहात या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तीच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे. तसेच आज जामखेड तहसील वर काढण्यात आलेल्या विद्यार्थी व सर्व पक्षीय मोर्चा मध्ये देखील अबिरा बाळासाहेब घोडेस्वार ही चिमुकली आपल्या पालकांसह सहभागी झाली होती.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!