एनसीसीमधून शिस्त, संस्कार आणि देशभक्तीची जडणघडण; कर्नल प्रदीपकुमार बेहरा

जामखेड प्रतिनिधी

“विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्वगुण, देशप्रेम आणि जबाबदारीची जाणीव देऊन एक चांगला नागरिक घडविणे हे एनसीसीचे प्रमुख ध्येय आहे. एनसीसीमधून शिस्त, संस्कार आणि देशभक्तीची जडणघडण होत असते. विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटी आत्मसात करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करावे असे मत कर्नल प्रदीपकुमार बेहरा यांनी व्यक्त केले.

दि राष्ट्रीय छात्र सेना (आर्मी) १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अहिल्यानगरचे नूतन कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रदीपकुमार बेहरा (३/४ जी आर रेजिमेंट) यांनी दि २५ ऑगस्ट २०२६ रोजी जामखेड विभागातील विविध एनसीसी युनिटला सदिच्छा भेट देऊन कॅडेट्स तसेच विद्यार्थ्यांना व असोसिएट एनसीसी अधिकारी यांना मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना कर्नल प्रदीपकुमार बेहरा म्हणाले की संरक्षण क्षेत्रात अधिकारी म्हणून करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासात सातत्य ठेवून कठोर परिश्रम करावेत. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक क्षमता, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एनसीसी अधिकारी व विद्यालयाला मार्गदर्शन केले.

कर्नल बेहरा यांनी जामखेड महाविद्यालय, जामखेड, ल. ना. होशिंग विद्यालय तसेच रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय, जामखेड येथील एनसीसी युनिटला भेट दिली. त्यांच्या भेटीदरम्यान जामखेड महाविद्यालयातील एनसीसी सीनियर डिव्हिजन भरती प्रक्रियेची पाहणी करून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ल. ना. होशिंग विद्यालयाला भेट देऊन शेवटी श्री नागेश विद्यालयातील एनसीसी युनिटची पाहणी केली.

तसेच कर्नल बेहरा यांनी प्राचार्य कॅप्टन ड. गौतम केळकर, प्राचार्य बाळासाहेब पारखे, प्राचार्य बी के मडके उप मुख्याध्यापक अनिल देड,सेकंड ऑफिसर मयूर भोसले यांचा एनसीसी ट्रॉफी. व भेटवस्तू देऊन सन्मान केला.

या भेटीप्रसंगी सुभेदार श्रीकांत मोरे, सुभेदार महेंद्र सिंग, हवालदार धीरेंद्र सिंग, म. अरुण (काका) चिंतामणी, शशिकांत देशमुख, राजेशजी मोरे
प्राचार्य बाळासाहेब पारखे, प्राचार्य बी. के. मडके, प्राचार्य कॅप्टन डॉ. गौतम केळकर, उपमुख्याध्यापक अनिल देडे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, क्रीडा संचालक आण्णा मोहिते, पर्यवेक्षक सुदाम वराट, संतोष ससाणे, गुरुकुल प्रमुख अशोक चौधरी, प्रा. कैलास वायकर, प्रा मांडे सर, संभाजी इंगळे, माजी एनसीसी कॅडेट प्रफुल्ल सोळंकी, राजेश भोगील आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्नल प्रदीपकुमार बेहरा यांच्या या सदिच्छा भेटीमुळे जामखेड विभागातील एनसीसी कॅडेट्समध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी सर्व विद्यालये व एनसीसी युनिटच्या वतीने कर्नल बेहरा यांचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here