

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्री नागेश विद्यालयाचे शहरी विभागातील १२ पैकी तब्बल ८ विद्यार्थी चमकले
शिष्यवृत्तीमध्ये जामखेड तालुक्यात श्री नागेश विद्यालयाचा डंका
जामखेड प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय, जामखेडने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. शहरी विभागातून निवड झालेल्या एकूण १२ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८ विद्यार्थी हे एकट्या श्री नागेश विद्यालयाचे असून, विद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षीही यशाची हॅटट्रिक साधत जामखेड तालुक्यात आपला दबदबा कायम राखला आहे.

या उल्लेखनीय यशानिमित्त विद्यालयात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य राजेंद्रजी कोठारी, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, कन्या विद्यालय स्कूल कमिटी सदस्य प्रकाश सदाफुले, कुंडल राळेभात, प्राचार्य बी. के. मडके, पर्यवेक्षक एस. व्ही. जाधवर, एनसीसी अधिकारी मयूर भोसले, महादेव खैरे, महादेव भोंडवे, शंकर भवर, अविनाश बोधले, शंकर पवार, संदीप सानप, शहादेव वराट, सौ. सुरेखा वराट आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरी सर्वसाधारण विभागातून शिष्यवृत्ती मिळविणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे आसुन यामध्ये शंभूराजे केशवराज कोल्हे – २७२ गुण
संचित संतोष खैरे – २६० गुण
यश महादेव भोंडवे – २५४ गुण
यशराज शंकर भवर – २५४ गुण
आयुष अविनाश बोधले – २५२ गुण
अथर्व हर्षलकुमार पवार – २३८ गुण
सार्थक संदीप सानप – २३२ गुण
यशराज शहादेव वराट – २३० गुण
तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत शिवकुमार केशवराज कोल्हे यांनी २७२ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

यावेळी स्कॉलरशिप विभाग प्रमुख संतोष पवार, संभाजी देशमुख, अशोक चौधरी, निलेश अनारसे, संतोष ससाणे तसेच प्राचार्य बी. के. मडके आणि इतर मार्गदर्शक शिक्षकांचा त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमात पालक प्रतिनिधी महादेव भोंडवे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “जामखेड शहरातील शहरी विभागात शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या १२ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी एकट्या श्री नागेश विद्यालयाचे आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी आहे. ‘रयतचे नागेश विद्यालय म्हणजे गुणवत्ता’ हे विधान या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”

रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष तथा आमदार रोहितदादा पवार यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशामुळे जामखेड शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात श्री नागेश विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला असून, सातत्यपूर्ण निकाल आणि उत्कृष्ट मार्गदर्शनाच्या जोरावर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांची पहिली पसंती म्हणून विद्यालयाची ओळख अधिक दृढ झाली आहे.





