जामखेड ची डॉ. मिसबा शेख नेत्रतज्ज्ञ (एम. एस) पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथिल डॉ. फारुख शेख यांची कन्या, मिसबा फारूख शेख ही नेत्ररोगतज्ज्ञ (एम.एस.) ही पदवी प्रथम श्रेणीत पास झाली. त्यांच्या यशाने जामखेडच्या वैद्यकीय क्षेत्रातील नावात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. मिसबा या जामखेड तालुक्यातील नेत्ररोगतज्ज्ञ मास्टर परिक्षेत पास होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

डॉ. मिसबा यांनी आपल्या शिक्षणातील यशाचा वाढता आलेख कायम ठेवला. त्यांनी ल. ना होशिंग विद्यालयातून १० वीला ९८.५५% मिळवून प्रथम श्रेणी मिळवली. तर बारावीला सारडा महाविद्यालयतून ८६% मार्क घेऊन पुणे बोर्डात पहिल्या शंभरमध्ये नंबर आल्याने इन्स्पायर अवॉर्ड मिळविला होता. त्यांनी स्कॉलरशिपचा विचार न करता. पदवीधर न होता मेडिकलला जाण्याचा निर्णय घेतला. अतिशय जिद्दीने व चिकाटीने एमबीबीएसची पदवी काशीबाई येथे घेतली.

त्यानंतर एमआयटी लातुरात नवले वैद्यकीय महाविद्यालय, पूणे वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र शस्त्रक्रियेची पदवी प्राप्त केली. या एमआयटी लातूर वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. मिसबा यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. डॉ. मिसबा शेख या जामखेड तालुक्यातील प्रसिद्ध डॉ. फारख शेख, डॉ. बिल्कीस बानो यांची कन्या तर जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनचे सचिव डॉ. सादिक पठाण यांच्या भाची आहेत. डॉ. मिसबा या नेत्रशस्त्रक्रिया पदवी प्राप्त करणाऱ्या तालुक्यातील प्रथम महिला डॉक्टर ठरल्या आहेत. या यशाबद्दल डॉक्टर असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, विविध सामाजिक संघटना, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ. मिसबा यांचे अभिनंदन केले जात आहे.

जामखेडकरांना आतापर्यंत अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, मुंबई आदी मोठ्या शहरात डोळ्यांसंबधी उपचारासाठी जावे लागत होते. आता ती सेवा जामखेडलाच भुमिकन्या डॉ. मिसबा यांच्याकडून मिळेल. व वडील डॉ. फारुख यांनी ज्या पद्धतीने जामखेड परीसरातील गोरगरीब लोकांना अगदी अल्प दरात आरोग्य सेवा पुरवून गोरगरीब कुटुंबातील लोकांचे आशिर्वाद प्राप्त केले होते. त्याच पद्धतीने डाॅ. मिसबा देखील आपल्या पिता प्रमाणे जनतेची सेवा करेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here