जामखेड रोखठोक

जामखेड बसस्थानकाजवळ गेली दोन तीन दिवसापासून रस्त्यालगत आजारी असलेल्या एका बेवारस वृद्ध महिलेस सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल करून , निराधारांना आधार देण्याचे काम केले.
जामखेड बसस्थानकालगतच्या रस्त्यावर एक बेवारस महिला गेली दोन ते तीन दिवसापासून पडून असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन द्वारे माहिती दिली. परंतु तीच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही त्यामुळे ती त्या ठिकाणी पडुन होती. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय कोठारी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेले असता त्या वयोवृद्ध महिलेची परिस्थिती खूप खराब होती. ही महिला गंभीर आजारी होती. या महिलेला रूग्णवाहिकेत आणून कोठारी यांनी सरकारी दवाखान्यात दाखल केले. दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी तिला तपासणी करून ताबडतोब उपचार चालू केले. तसेच आत्तापर्यंत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अशा अनेक बेवारस महिला व पुरुषांना आणून व्यवस्थित करून घरी पोहोच केले आहे. यावेळी या महिलेला रूग्णालयात आणण्यासाठी कोठारी यांना अनिल बाफना, शिवाजी लगड ,अरुण गीते ,अभय बाफना, संकेत कोठारी , विकी भोसले चेतन जोशी , तुषार शिरोळे ,बापू दुर्गळ, रोहित माने यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here