जामखेड प्रतिनिधी
अतिशय गरीब परीस्थितीवर मात करत जामखेड येथील कोमल गुलाब लोखंडे हीने कोटा मेंटर्स कॉलेज अॉफ कर्जत यांच्या NEET या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळविला आहे.
कोमल गुलाब लोखंडे यांची कोटा मेंटर्स कॉलेज अॉफ कर्जत यांच्या NEET या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये कर्जत जामखेड मधुन दुसरा क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेमध्ये जवळ जवळ दोन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. भटक्या सामाज्यातील विद्यार्थीनीने या परीक्षेत यश मिळविल्याबद्दल तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक व दुर्गामाता सोसायटीच्या नागरीकांच्या वतीने तीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या बद्दल माजी नगराध्यक्ष निखिल (आप्पा) घायतडक व दुर्गामाता सोसायटीचे पोपट लोखंडे, राकेश घायतडक, शिवा लोखंडे, बापु लोखंडे, विष्णु लोखंडे, अमोल लोखंडे, बाबु शिंदे, ताया लोखंडे, ताया वाघमोडे, बदाम देडे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.



