Home क्राईम न्यूज फक्राबाद येथे दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये चार जण गंभीर जखमी, १ लाख ९० हजार...

फक्राबाद येथे दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये चार जण गंभीर जखमी, १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास

फक्राबाद येथे दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये चार जण गंभीर जखमी, १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने आढाववस्ती येथे दरोडा टाकत कोयत्याने केलेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच घरातील १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. या घटनेत मारहाण झालेल्या तीन जणांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. फक्राबाद येथिल दरोड्याच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरोडेखोरांच्या मारहाणीत फीर्यादी कौशल्या आण्णासाहेब आढावा वय ४८, अंगद अण्णासाहेब आढाव, मैनाबाई मधुकर पारे व वृध्द महीला सुभद्रा आण्णासाहेब आढाव आसे एकुण चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील फीर्यादी कौशल्या आण्णासाहेब आढावा या आपल्या कुटुंबा समवेत फक्राबाद येथिल आढाव वस्ती या ठिकाणी घरासमोरील पडवीमध्ये झोपले होते. या वेळी ३१ मे २०२६ रोजी रात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने फीर्यादी यांच्या घरासमोर आले व पडवी मध्ये झोपल्या चार जणांनवर या दरोडेखोरांनी कोयता गज व काठीने मारहान करण्यास सुरुवात केली. या घटनेत चारजण गंभीर जखमी झाले आसुन यातील फीर्यादी कौशल्या आण्णासाहेब आढावा वय ४८, अंगद अण्णासाहेब आढाव, मैनाबाई मधुकर पारे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे तर वृध्द महीला सुभद्रा आण्णासाहेब आढाव यांच्यावर जामखेड येथे उपचार सुरू आहेत.

यानंतर दरोडेखोरांच्या टोळीने घरामध्ये प्रवेश करुन घरातील सामानाची उचकापाचक करुन कपाटातील रोख ४० हजार रुपये व दीड लाख रुपयांचे साडेतीन तोळे सोने असा एकुण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज या दरोडेखोरांनी लंपास केला. यानंतर आरडाओरडा झाल्यावर आजुबाजुच्या वस्तीवरील लोक घटनास्थळी धावत आले मात्र तो पर्यंत दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या प्रकरणी फीर्याद कौशल्य आण्णासाहेब आढावा यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन सात ते आठ अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करित आहेत.

चौकट

चोंडी येथे दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्रीसह अनेक मंत्री येणार असल्याने पोलिसांचा मोठा राबता होता. चोंडी ते फक्राबाद हे १२ कि. मी. चे अंतर आहे. रात्रभर वाहनांची वर्दळ असताना दरोडेखोरांनी दरोडा टाकून तीन जणांना कोयत्याने मारहाण करून जखमी केले. सदर घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट पाचारण केले. परंतु अद्याप तपासात प्रगती नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!