अरुण ढवळे यांची संभाजीनगर जिल्हा परिषद शाळेवर पवित्र पोर्टल मार्फत सहशिक्षक पदी निवड.
जामखेड प्रतिनिधी
विंचरणा विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आसुन पिंपरखेडचे सुपुत्र अरुण दिगांबर ढवळे यांची संभाजीनगर जिल्हा परिषद शाळेवर पवित्र पोर्टल मार्फत सहशिक्षक पदी निवड झाली.

पाटोदा ग्रामपंचायतीतर्फे सरपंच गफ्फार पठाण यांनी अरुण ढवळे सर यांचा सत्कार केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना ढवळे सरांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय वडील संस्थापक अध्यक्ष दिगांबर ढवळे व श्री विंचरणा विद्यालय पिंपरखेड शाळेला दिले.

यावेळी पाटोदा पोस्ट मास्टर गोरख राजगुरू, पाटोदा विकास सेवा सोसायटी संचालक भय्यासाहेब थोरात, नवनाथजी गव्हाणे (राष्ट्रवादी चे लंके समर्थक ), शमीर सय्यद, प्रकाश कडू, कल्याण कवादे पाटील, पिंपरखेड चे साई डेअरी संचालक मोहिदिन शेख, आनंदराव कदम, गणेश कापसे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here