


शहरातील महामार्गाच्या अतिक्रमणा बाबत दुजाभाव होणार नाही – आ. रोहीत पवार
आ. रोहित पवार यांच्या कडून जामखेड शहरातील विविध विकासकामांची पहाणी.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पुर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गरीबांच्या जशा टपऱ्या काढण्यात आल्या तसेच मोठ्यांचे अतिक्रमण काढताना देखील दुजाभाव होणार नाही. असे स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवार दि १२ मे रोजी सकाळी जामखेड शहर व तालुक्यातील सुरू आसलेल्या विकासकामांचा आढावा घेतला त्यामध्ये प्रामुख्याने जामखेड बसस्थानकात पहाणी करून तेथील समस्या आ. रोहित पवार यांनी जाणुन घेतल्या व ठेकेदार व अधिकारी यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुचना केल्या.

नविन पंचायत समितीच्या निवासस्थानाच्या बांधकामाची व जिल्हा उपरुग्णालयाच्या कामाची प्रत्यक्ष पहाणी करत अढावा घेतला आसुन राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात विरोधाकांवर टीकास्त्र सोडले आहे. पुढे बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात जामखेड बसस्थानकासाठी नीधी आनला व काम देखील सुरु केले. सध्या बसस्थानकाचे ९९ टक्के काम पुर्ण आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करु. बस स्थानकाच्या गाळेवाटप करताना प्रथम प्राधान्य हे पुर्वीच्या गाळेधारकांना देण्यात येईल. युवा वर्गाला देखील पारदर्शक पध्दतीने गाळे उपलब्ध करुन देण्यात येतील. बस स्थानकाच्या शौचालयाच्या सांडपाण्याबाबत स्थानिक नागरीकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्याचा देखील बंदोबस्त करण्याच्या सुचना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या अतिक्रमणावर बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले की काही मोठे व्यापारी हे इतर पदाधिकाऱ्यांना भेटुन आमचे दुकान व घर वाचवा असे सांगतात. मोठ्या लोकांनी गावाला वेठीस धरले आहे. आमचे विरोधक सामान्यन पेक्षा पैशावाल्यांशी राहुन त्यांचे जास्त काम करत आहेत असे जाणवते असे आ. रोहीत पवार यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात विरोधाकांवर टीकास्त्र सोडले.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, अमोल राळेभात, शहाजी राळेभात, रमेश आजबे, वैजिनाथ पोले, सागर कोल्हे, लक्ष्मण ढेपे, नगरसेवक राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, प्रशांत राळेभात, कुंडल राळेभात, संदिप गायकवाड, हरीभाऊ आजबे, दादा उगले व बजरंग डुचे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.








