धामणगाव, नान्नज परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

जामखेड प्रतिनिधी

धामनगाव व नान्नज भागात बुधवारी दुपारी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडले, घरावरील तसेच गुरांच्या गोठ्यावरील पत्रे उडाली काही ठिकाणी लाईटचे पोल पडले तसेच आंबा, कांदे, पपई पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. याच बरोबर नान्नज भागातील चोभेवाडी बर्‍हानपुर व मुंजेवाडी भागात देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जामखेड तालुक्यातील धामणगाव परिसरात दि. १३ वार बुधवार रोजी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे एकच हाहाकार उडाला काही लोकांचे कांदे भिजले, आंबा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले तसेच पपईच्या बागेचेही नुकसान झाले. परिसरात अनेकांच्या घरावरील व गोठ्यावरील पत्रे उडाली, गावात टपरीवर झाड पडल्याने टपरीचे नुकसान झाले तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले. धामणगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

परिसरातील राजेंद्र नारायण घुमरे, दिपक किसन घुमरे, विमल मधुकर कुंभार, दत्तात्रय किसन घुमरे, सचिन शामराव घुमरे, भागवत आश्रु महारनवर, संतोष महारनवर, उर्मिला घुमरे, दादा ढाळे, संदिपन घुमरे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, कच्चे आंबे झाडांवरून खाली पडले आहेत, काढणीला आलेला कांदा तसेच काढून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे.

याच बरोबर नान्नज परिसरातील बऱ्हाणपूर, चोभेवाडी येथे राहत्या घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. तसेच आंब्याच्या बागा तसेच शेततळे यांचे ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्हाणपूर चोभेवाडी येथिल लक्ष्मण गणपत वाळुंजकर व चंपाबाई लक्ष्मण वाळुंजकर. त्याच बरोबर इतर आंब्याच्या बागा आणि शेततळे यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळा भागातील मुंजेवाडी येथे झालेल्या वादळी पावसामुळे बाबुशा लक्ष्मण जाधव यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून जाऊन नुकसान झाले आहे. नान्नज येथील शेतकरी आजिनाथ अर्जुन कुमटकर यांचे आंबा व लिंबोनी फळबागाचे देखील वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले.

चौकट

धामणगाव नान्नज परीसरात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मोठे पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ताबडतोब प्रशासनाशी संपर्क करावा. या नुकसान झालेल्या पिकांचे व घरांचे महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी सरपंच महारूद्र महारनवर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here