जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराच्या मनमानी कामकाजाची चौकशीची मागणी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड करमाळा रोड लगत पाईप लाईन टाकण्याचे काम चालु असून सदर कामात हलगर्जीपणा व कायद्याची पायमल्ली होत असल्यामुळे जामखेड तालुका शिवसेना शिंदे गटातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्यचा इशारा जामखेड शहर शिवसेनाप्रमुख देविदास भादलकर व मुस्तफा शेख जिल्हाअल्पसंख्याक अध्यक्ष शिवसेना यांनी दिला आहे.
तालुका शिवसेना शिंदे गटातर्फे देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, जामखेड नगरपरीषदेचे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेचे पाणीपुरवठ्याचे काम चालु असुन हे काम ईगल इन्फ्रा इंडिया ह्या कंपनी तर्फे मोनीश गुरुबक्सानी व अनिल गुरुबक्सानी हे पाहत आहेत. जामखेड करमाळा रोड लगत पाईप लाईन टाकण्याचे काम करताना सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी, तसेच पाईप लाइन चे काम करताना अनेक झाडे निघाली आहेत त्या वनखात्याची परवानगी सुद्धा, ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी आज रोजी पर्यंत घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
म्हणजेच हे पाईप लाईन टाकण्याचे काम हे विना परवाना म्हणजेच बेकायदेशीर पणे चालु आहे. शिवाय करमाळा जामखेड -पाटोदा ह्या रोडच्या रुंदीकरणाच्या मंजुरी साठी प्रस्ताव शासना दरबारी प्रगती पथावर आहे. रस्ता रुंदीकरणात पाईप लाईन मधेच आल्यास यास जबाबदार कोण? काम करणाऱ्या कंपनीस कामाचा कार्यारंभ आदेश हा अंदाजे ६ महिन्यापुर्वीच मिळाला आहे. मग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जामखेड नगरपरिषद व ठेकेदार हे काय झोपा काढत आहेत काय? ठेकेदाराने जामखेड करमाळा रोडच्या कडेने टाकलेले पाईप हे रोडच्या साईट पट्टीवर टाकले आहेत. हे अपघातास आमंत्रण ठरू शकतात. का एखादा अपघात होण्याची ठेकेदार वाट पाहत आहे का? हे ठेकेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लक्षात येत नाही का ? सार्वजनिक बांधकाम खाते एव्हडे दिवस काम सुरु असताना या बाबी त्यांच्या लक्षात येत का नाहीत का? या सगळ्यांची मिलीभगत तर नाहीना? असं प्रश्न त्यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
एकंदरीत पाहता इतकी महत्त्वकांक्षी योजना आमदार महोदयांनी मंजुर करून आणली आहे ती ठेकेदाराच्या मनमानीने रामभरोसे चालले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगीच नसल्याने रोडच्या मध्यापासून नेमके किती अंतरावर पाईप लाईन टाकायची आहे. हे कसे समजायचे? काही ठिकाणी पाईप लाईन जमिनीवर आहे कि जमिनी खालून आहे हे हि समजत नाही. हि योजना ठेकेदारासाठी आहे कि जामखेड वासियांसाठी आहे. हे जामखेड वासियांना समजले पाहिजे.
शिवाय ठेकेदाराची भाषा खुपच उर्मट पनाची आहे, ती शेतकरी, कर्मचारी यांच्याशी दादागिरी ची भाषा बोलतो स्टाफ कडून काम करून घेऊन त्यांचे पैसे न देऊन पैसे बुडवत) त्यांची आर्थिक फसवणूक करत आहे. तसेच जामखेड मधील दुकानदारांची उधारी करून त्यांचे पैसे सुद्धा देत नाही. पाईप वितरणाचे पाईप टाकताना रस्ता खराब करीत आहे. या सगळ्या बाबीवर शासनाकडून सखोल चौकशी होऊन दोषीवर योग्य कारवाई करण्याची मागणी जामखेड शहर शिवसेना शिंदे गट तर्फे करण्यात आली आहे.
याबाबत कारवाई झाली नाही तर दिनांक १३ एप्रिल रोजी तहसिल कार्यालया समोर सकाळी ठीक १० वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अहमदनगर जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुस्तफा शेख (मेजर) व शहर प्रमुख शिवसेना देविदास भादलकर यांच्या सह्या आहेत.