शिवजयंतीनिमित्त जामखेड शहरात लक्षवेधी भव्य मिरवणूक
सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त दि.१२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्मीय व सर्व पक्षीय तालुकास्तरीय आशा भव्य दिव्य सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य आशी मिरवणूक शहरातुन काढण्यात आली होती. तसचे यावेळी रांगोळी स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त दि १२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दि १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सवानिमित्त भव्य आशी शहरातुन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच रांगोळी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक महीला स्पर्धकांनी आपल्या दारासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या.
आत्ता पर्यंत सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त जामखेड येथे आरोग्य तपासणी शिबीर , महाराष्ट्राचा महावक्ता वकृत्व स्पर्धा, राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धा, निबंध स्पर्धा, जामखेड क्रिकेट असोसिएशन आयोजित जे. सी. ए. प्रिमियर लिग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच दि २२ फेब्रुवारी व २३ रोजी फेब्रुवारी रोजी देखील मराठी मुलांची शाळा या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता जामखेड तालुक्यातील सर्व शाळांचे महा शिव स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. शिव स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.