

आ. रोहित (दादा) पवार मित्र मंडळाच्या वतीने जामखेड येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सवासाठी ३ लाख १ हजारची देणगी.
जामखेड प्रतिनिधी
गेल्या सात दिवसांपासून जामखेड येथे सुरु असलेल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवास आ. रोहित पवार मित्र मंडळाच्या वतीने ३ लाख १ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त दि.१२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य सार्वजनिक जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी आठ ते दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने आ. रोहित (दादा) पवार मित्र मंडळाच्या वतीने नुकतीच सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे आयोजक डॉ प्रशांत गायकवाड, अवधूत पवार, डॉ भरत देवकर, दत्तात्रय सोले पाटील, महेश यादव यांच्या कडे ३ लाख १ हजार रुपयांची देणगी सुपूर्त करण्यात आली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी (काका) राळेभात, शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस प्रा .राजेंद्र पवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत (काका) राळेभात, युवक शहर अध्यक्ष वसीम सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथ्था व सुरेश पवार, गणेश डोके ,लक्ष्मण ढेपे हे उपस्थित होते.


Post Views: 21
error: Content is protected !!