आवडेल त्या विषयात करिअर करुन शाळेसह आई वडीलांचे नाव उज्ज्वल करा – डॉ भगवान मुरूमकर

जामखेड (प्रतिनिधी) यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून अपयश आलं तर खचू नका, कोलमडू नका, पुन्हा प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेत येईल. आवडेल त्या विषयात करिअर करा मात्र जिथे जाल तिथे कष्ट करा आपले व आपल्या आई-वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल करा असे प्रतिपादन जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

 

श्री साकेश्वर विद्यालयात इयत्ता दहावीचा सदिच्छा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ भगवान मुरूमकर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती, प्राचार्य श्रीकांत होशिंग, संजय वराट, माजी चेअरमन व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक प्रा. अरूण वराट, चेअरमन कैलास वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानदेव मुरूमकर, व्हाइस चेअरमन दादासाहेब नेमाने, प्राचार्य दादासाहेब मोहिते, बाळासाहेब वराट, पोलीस पाटील महादेव वराट, संतोष देशमुख, अभिषेक पाटील, सचिन मुरूमकर, कांचन निकाळजे, शिवचंद वराट, रामचंद्र वराट गुरूजी, प्रभु वराट गुरूजी, गोपाळ नेमाने, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर,आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. भगवानराव मुरूमकर म्हणाले की, शाळेच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थ एकत्रित प्रयत्न करतात कधीही शाळेत राजकारण आणले जात नाही. राजकीय जोडे नेहमी बाहेरच ठेवतोत. तसेच मुलींच्या वेगवेगळ्या प्रगतीबद्दल डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी शाळेचे कौतुक केले.

इयत्ता दहावीत 2020, 21, 22 मध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेल्या गुणवंत विदयार्थी, गणित विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केलेले विद्यार्थी, शिक्षक, चित्रकला स्पर्धेत, मैदानी क्रीडा प्रकारात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेसाठी मिटींग टेबल भेट दिला, तसेच हराळे भाऊसाहेब यांनी शाळेसाठी दोन कपाट व खुर्ची भेट दिली.

यावेळी राधिका वराट, दिपाली वराट, या इयत्ता दहावीत विद्यार्थींनीनी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर चेअरमन कैलास वराट, प्राचार्य दादासाहेब मोहिते, सभापती संजय वराट, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उद्धव (बापू) देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, शशिकांत देशमुख यांनी आपले मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट, अर्जुन रासकर यांनी तर आभार अशोक घोलप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here