जामखेड (प्रतिनिधी) जामखेड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रिपब्लिकन चिंतन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन फेसबुक लाईव्ह करण्यात आले आहे . हे चिंतन अभियान एम,जी हाॅल, नगर रोड जामखेड येथे रिपब्लिकन पक्षाच्या दिग्गज कार्यकर्त्याच्या उपस्थित संपन्न होणार असल्याची माहिती रिपाईचे सतीश ( नाना) साळवे साळवे यांनी दिली. कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे असतील . रिपब्लिकन राजकारण निर्धार दिन या निमित्त दिनांक 18 मार्च ते 31 मार्च पर्यंत दररोज फेसबुक लाईव्ह वर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.यावेळी अनेक रिपाईचे कार्यकर्ते व मान्यवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान रिपाई च्या वतीने करण्यात आले आहे

या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीकांत भालेराव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या हस्ते तर प्रमुख मार्गदर्शक महेंद्र निकाळजे संस्थापक मी रिपब्लिकन फेसबुक पेज तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील साळवे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्य सचिव विजय वाकचौरे, उत्तर महाराष्ट्राचे सचिव अजय साळवे,अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, अहमदनगर युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल कांबळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष आरतीताई बडेकर, रिपाई पारधी आघाडी महिला जिल्हाध्यक्ष पार्वती ताई भोसले, श्याम भोसले,जिल्हा नेते विजय भांबळ, गौतम घोडके, दत्ताजी कदम ,धरम घायतडक ,संजय कांबळे विलास साठे, रवींद्र आरोळे ,चंद्रकांत मोरे ,सिद्धार्थ शिसोदे इत्यादी रिपाई मान्यवरांच्या उपस्थितीत हा फेसबुक लाईव्ह सोहळा संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगाच्या काना कोपर्यात रिपब्लिकन पक्षाची संकल्पना राजनिती व येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांनी आपले मनोबल उंचावण्यासाठी पक्षवाढीसाठी समाजासाठी समाज कारणांबरोबरच राजकारण करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तेरा दिवस चालणाऱ्या या चिंतन सोहळ्याची सुरुवात जामखेड नगरीतून होतं आहे त्यामुळे जामखेड तालुक्यातील रिपाई कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन रिपाइंच्या वतीने करण्यात आले.
१८ मार्च रोजी कार्यक्रम संपल्या नंतर जामखेड तालुका रीपाई ची बैठक होणार असून या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here