तलाठ्यास मागीतली खांडणी, दोन गुन्ह्यांमध्ये एकुण सात जणांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

नान्नज येथील फीर्यादी तलाठी प्रितम आशोक खाडे यांना दरमहा पाच हजार व याच गावातील दुसरे फीर्यादी संदिप नानाजी भवळ यांना घरे पाडायची नसतील तर प्रत्येकी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळ्या दाखल करण्यात आलेल्या फीर्यादी नुसार महादेव अरुण साठे यांच्या सह एकुण सात जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत नान्नज गावचे तलाठी प्रितम आशोक खाडे यांनी पहील्या फीर्यादी म्हंटले आहे की फिर्यादी हे सन २०२३ पासून नान्नज येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ते कार्यालयीन शासकीय कामकाज करत असताना आरोपी महादेव अरुण साठे, विशाल साठे, अलोक राजू साठे आणि आकाश राजू साठे सर्व रा. नान्नज ता. जामखेड हे चौघे तलाठी कार्यालयात आले व फीर्यादीस म्हणाले की ‘नान्नज येथे काम करायचे असेल तर दर महिन्याला ५ हजार रुपये द्यावे लागतील’, अशी मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत माहिती अधिकाराचे अर्ज देण्याची आणि खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याचवेळी आरोपी महादेव अरुण साठे याने नारळ तोडण्याचा कोयता दाखवून पैसे देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. या धमकीमुळे घाबरून आपण ५ हजार रुपये दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपींनी कार्यालयातील शासकीय दस्तऐवज ओढून घेत इतरत्र फेकून दिले. तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.

याच आनुशंगाने जामखेड पोलिस स्टेशनला फिर्यादी संदीप नानाजी भवाळ (वय ६२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. अण्णाभाऊ साठेनगर, नान्नज, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी दुसरी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव अरुण साठे, भाऊसाहेब साहेबराव साठे, संदीप बाबुराव साठे आणि गौतम भिकाजी साठे, सर्व रा. नान्नज, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर, अशा चार जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता, तसेच २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता आणि रात्री सुमारे ८ वाजता, नान्नज येथील फिर्यादीच्या घरासमोर वरील आरोपींनी शिवीगाळ करत समाज मंदिराच्या जागेत बांधलेली घरे पाडून समाज मंदिराची जागा मोकळी करून द्यावी, अन्यथा एकेकाला तोडून टाकीन, तसेच समाज मंदिराच्या जागेत बांधलेली घरे पाडायची नसतील तर प्रत्येकी एक लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून फिर्यादीला शिवीगाळ करण्यात आली. “तू येथे कसा राहतोस, आम्ही जेसीबी आणून सर्व घरे पाडून टाकू, तुमचा धुराळा करू,” अशा स्वरूपाची धमकी देखील फीर्यादीस दिली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे व पोलीस हवालदार टी.बी. सोनवणे हे करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here