


बीएसएनएल अहिल्यानगर जिल्हा सल्लागार समितीवर पोपटराव गायकवाड यांची नियुक्ती.
जामखेड प्रतिनिधी
भारत संचार निगम (BSNL) अहिल्यानगर जिल्हयाच्या सल्लागार समीतीवर पोपटराव गायकवाड यांची निवड खा.निलेशजी लंके यांच्या शिफारशी नुसार चेअरमन व मॅनेजींग डायरेक्टर भारत संचार निगम नवी दिल्ली उर्वशी संगवान यांनी केली आहे.

जातेगावचे रहीवाशी व या पुर्वी. दै लेकमात, दै पुण्यानगरी सारखा पेपरचे तालुका प्रतिनीधी म्हणून काम केलेले तसेचं जातेगाव ग्रा. प. चे सरपंच उपसरपंच राहिलेले पत्रकार पोपट गायकवाड यांनी या पूर्वी अ. नगर जिल्हापत्रकार संघाचे सचीव जामखेड तालुका सरपंच संघाचे सचीव म्हणूनही त्यांनी काम केलेले असनामुळे भारत संचारच्या सुधारणा करण्यासाठी सल्लागार म्हणून जिल्ह्याचे खासदार. निलेश लंके यांनी केंद्रीय दुरसंचार मंत्र्याकडे पत्राद्वारे सुचीत केले होते. त्याची दखल घेऊन केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची सदरच्या समोतीवर निवड केली आहे त्यांच्या निवडी बद्दल खा. निलेश लंके च भारत संचार निगम अहिल्यानगर सभागृहात नुकताच सत्कार करून भारत संचार सेवेच्या सुधारण व सेवा जलद व अखंडीत कशी करुन घेता येईल हे पहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

या निवडी बद्दल राष्ट्रवादी (शरदचंद्र) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर आमदार रोहीत पवार तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर आर पीआय जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, पत्रकार नासीर पठाण, संतराम सुळ, वसंत सानप, सुदाम वराट, अशोक निमोणकर, मैनुद्दीन तांबोळी, मिठदलाल नवलाखा, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, ओंकार दळवी, समीर शेख, अशोक वीर, धनराज पवार, संजय वारभोग, निलेश वनारसे, विजय अवसरे, नंदुसिंग परदेशी, फारूख शेख, सतोष थोरात, दत्तराज पवार , बाळासाहेब वराट , प्रकाश खांडागळे, अनिकेत चव्हाण, यांनी अभिनंदन केले आहे.









