कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; सिमेंट मिक्सरची इको कारला जोरदार धडक, ११ प्रवाशांचा मृत्यू

अहिल्यानगर : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला आहे. एका ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली असून, या भीषण अपघातात अकरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या धडकेनंतर ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सिमेंट मिक्सर आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या भीषण धडकेत अकरा जणांनी जागीच प्राण गमावले आहेत.

या अपघातात ११ जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ईको टॅक्सी आणि मिक्सर ट्रकमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला. मयत सर्व मुरबाड मधील रहिवाशी आहेत. कल्याणहून मुरबाडला जात होते. पुलावर एकमार्ग सुरू असल्याने अपघात झाला आहे. प्रशासनाने योग्य ती काळजी न घेतल्याने स्थानिकांचा आरोप आहे. घाई घाईत पूल सुरू केल्याने अपघात झाला आहे, असंही स्थानिकांनी म्हटलं आहे. तर ईको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते अशीही माहिती आहे.

स्थानिकांची मदतीसाठी धाव
अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना आणि जखमीला बाहेर काढले.

या अपघातातील दोन गंभीर जखमी व्यक्तींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरती एका पुलावरती हा भीषण अपघात झाला आहे. सिमेंट मिक्सर आणि ईको या कारमध्ये अपघात झाला. कल्याण ते मुरबाड अशी प्रवासी वाहतूक करणारी ही ईको कार होती. ईको कारने सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिल्याने या कारमधील 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यातील 2 प्रवासी बचावले आहेत, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना बाहेर काढलं, २ जण गंभीर जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

स्थानिक नागरिकांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, ईको कारमधून अकरा प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले होते, त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here