

समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे राज्यस्तरीय महागौरव पुरस्काराने सन्मानित
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार
जामखेड प्रतिनिधी
एन.टी.व्ही. न्यूज मराठीचा पुरस्कार सोहळा १२ ऑगस्ट २०२५ रोजी अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने ,महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, आ. संग्राम जगताप, उपजिल्हा अधिकारी गणेश राठोड, ॲड. सुभाष काकडे, विकास भोसले सातारा, सतीश सावंत संपादक दै. माणदेश नगरी, सोलापूर, जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, आरणगाव चे सरपंच लहु शिंदे, मिठूलाल नवलाखा, सचिन गाडे, रजत दायमा, दिपक भोरे ,आलोक नवलाखा, नंदूसिंग परदेशी आदी उपस्थित होते.

एन.टी.व्ही. न्यूज मराठी चे संपादक इक्बाल शेख यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “गेल्या २३ वर्षां पासून डिजिटल माध्यमांनी समाजात घडामोडी पोहचवण्याची गती आणि पारदर्शकता वाढवली आहे. या प्रवासात एन.टी.व्ही. न्यूज मराठीने सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य निष्ठेने केले आहे. ‘शाही पुरस्कार’ सोहळा हा केवळ एक पुरस्कार नसून आपल्या क्षेत्रात नवनिर्मिती प्रामाणिकपणा समाजकार्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान एक विशेष उपक्रम आहे यावर्षी पत्रकारिता सामाजिक कार्य, न्यायव्यवस्था ,पोलीस प्रशासन, ग्रामीण विकास, तसेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे असे एन टीव्ही न्यूज चे संपादक इकबाल शेख म्हणाले.

चौकट
डॉ.भरत दारकुंडे यांनी कोरोना काळामध्ये सर्वात प्रथम जामखेड तालुक्यात कोरोना सेंटरची उभारणी करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. या केलेल्या विशेष कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.







