रत्नदीप मेडिकलच्या विद्यार्थींचे मागिल वर्षे वाया गेले. यावर्षीही 950 विद्यार्थींचे स्थलांतर रखडले
पांडुराजे भोसले यांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कडुन विद्यार्थींची आर्थिक माणसीक व शारीरिक छळ होत होता. या निषेधार्थ मागिल तीन महीन्यांपासून विद्यार्थ्यांच्या समवेत पांडुराजे भोसले यांनी आंदोलन व उपोषण सुरू केले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता इतर कॉलेज मध्ये स्थलांतर करण्याचे अश्वासन देण्यात आले होते. यावेळी पांडुराजे भोसले यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. मात्र तीन महिन्यात फक्त बीएएमएस व नर्सिंग कॉलेज वगळता इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींचे स्थलांतर झालेच नाही. त्यामुळे विद्यार्थींचे मागिल वर्षे वाया गेले आणि आता 950 विद्यार्थींचे स्थलांतर रखडले आहे.
रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या छळा नंतर पुन्हा शासनाकडूनही विद्यार्थींंची चालढकल होत आहे का असाच प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यार्थ्यांचे इतर मेडिकल कॉलेजमध्ये तात्काळ स्थलांतर व सर्व कॉलेजच्या परवानग्या रद्द करण्यासाठी शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना 950 विद्यार्थींनी पाठिंबा देऊन ते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नाही. आ.प्रा राम शिंदे यांनी देखील अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. अधिवेशनात कारवाईचे आश्वासन दिले मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नाही.
यानंतर उपोषणाच्या तिसर्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे रायगड विद्यापीठाचे डॉ प्रदिप बोडखे व एस आर भागवत यांनी भेट घेऊन कारवाई बाबत माहिती दिली. मात्र यावर विद्यार्थी व उपोषणकर्ते यांचे समाधान झाले नाही त्यामुळे गेल्या सहा दिवसापासून हे उपोषण सुरूच राहीले आहे.
गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेल्या पांडुराजे भोसले यांच्या उपोषणाकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे. सध्या भोसले यांची प्रकृती खालावली आसल्याने त्यांना तातडीने सलाईन लावण्यात आले असुन आंदोलन करणार्या एका विध्यार्थींनीलाही चक्कर आल्याने तीला शेजारील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एवढे सगळे होऊनही प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही. रत्नदीप मेडिकल फाउंडेशन ची मान्यता अद्याप रद्द झाली नाही. तसेच विद्यार्थींचे स्थलांतर देखील केले नाही प्रशासन केवळ वेळकाढूपणा करत आहे. काही दिवसात दुसरे वर्ष सुरू होत असून विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाले नाही तर पुन्हा शैक्षणिक नुकसान होणार हे निश्चित आहे. त्यामुळे प्रशासनाने व संबंधित विद्यापीठांनी गांभीर्याने या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी विद्यार्थींन कडुन होत आहे.
आ. रोहित पवार यांनी देखील आज सुरू आसलेल्या पावसाळी अधिवेशनात रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थींचे प्रश्न व सध्या पांडुराजे भोसले यांचे सुरू आसलेल्या आमरण उपोषण या विषयाकडे लक्ष वेधले. दोन दिवसांपूर्वी आ. प्रा राम शिंदेनी देखील हाच प्रश्न उपस्थित केला होता आता प्रशासन व विद्यापीठ विद्यार्थ्यांचा स्थलांतराचा प्रश्न व रत्नदीप मेडिकल कॉलेजवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.