कर्जत प्रतिनिधी
पुणे, नगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातील शेतकर्यांना वरदान असणाऱ्या कुकडी प्रकल्पातील आडगाव धरणांमधून 20 रोजी रात्री 521 क्यूसेक एवढ्या वेगाने पाणी सोडण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी दिली.
कुकडीचे आवर्तन प्रत्यक्षात 9 मे रोजी सुटणार होते कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये तसा निर्णय घेण्यात आला होता परंतु जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून या आवर्तनास स्थगिती दिली होती. यानंतर 12 मे व 17 मे असे दोन दिवस न्यायालयामध्ये याचीके संदर्भात तारखा देण्यात आल्या परंतु याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतल्यामुळे या आवर्तनाचा मार्ग मोकळा झाला. या पाण्यामुळे पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना पाणी मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. आवर्तन केवळ आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे सुटले आहे हे आवर्तन टेल टू हेड असून शेतकऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करत कुठलीही चारी मध्येच न उघडता आवर्तन पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे व सर्वांना पुरेसे पाणी यामधून दिले जाणार आहे कोणीही आ वर्तनामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.






