

शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचं उज्वल भविष्य आ. रोहित पवार हेच घडवू शकतात- मनिष सिसोदिया
जामखेड प्रतिनिधी
जामखेड – रोहित पवार यांच्यासारखा आमदार तुम्हाला मिळाला हे तुमचं सौभाग्य आहे, कोणता आमदार शिक्षणासाठी कोणी प्रयत्न करत नाही, रोहित पवार पुर्ण ताकतीने शिक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, ते आताच इतका प्रयत्न करतात तर विचार करा रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल, ते शिक्षणासाठी किती काम करतील. या आमदाराला कधी गमावू नको, आमदार रोहित पवार हे खूप कामाचे आहेत, चांगला माणूस आहे, यासाठी नाही तर तुमच्या मुलांचं उज्वल भविष्य हा आमदार घडवू शकतो असे प्रतिपादन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी केले.

जामखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या दहा खोल्यांचे उद्घाटन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ,कार्यसम्राट आमदार मा रोहित दादा पवार, नितीन कराळे मास्तर, प्रदेश सचिटणीस राजेंद्र कोठारी, सूर्यकांत नाना मोरे, संजय वराट सर, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, मा पंचायत समिती सभापती सौ राजश्री ताई मोरे, सुरेश भोसले, पोले नाना, रमेश दादा आजबे, राजेंद्र पवार, युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष उमर कुरेशी, ओबीसी तालुकाध्यक्ष विश्वनाथ भाऊ राऊत, आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, उपसभापती कैलास वराट सर, कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष हनुमंत पाटील, मंगेश दादा आजबे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, ॲड हर्षल डोके पाटील, कार्याध्यक्ष सागर कोल्हे, काकासाहेब कोल्हे, वसीम सय्यद, युवराज उगले, रामहरी गोपाळघरे, प्रवीण उगले ‘सिद्धेश्वर लटके ‘बाळासाहेब खैरे, गणेश चव्हाण, गटविकास अधिकारी पोळ, शिक्षण अधिकारी खैरे , किसन बापू ढवळे, अनिल मामा बाबर, नितीन ससाणे, सरपंच निलेश पवार, बिरंगळ साहेब, अमोल गिरमे, डॉ चंद्रशेखर नरसाळे, हरिभाऊ आजबे, मनोज भोरे, राहुल बेदमुथ्था, कुंडल राळेभात, प्रविण उगले, सचिन शिंदे, अशोक पठाडे, बिलाल शेख, संदीप गायकवाड, बहिर सर, मगर साहेब, भारत काकडे, काकासाहेब चव्हाण, बापू कार्ले, अमर चाऊस, सचिन डोंगरे, महेश राळेभात, आम आदमी पक्षाचे नेते, पदाधिकारी,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमावेळी बोलताना मनिष सिसोदिया यांनी भाजपसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिलियन डॉलर किंवा ट्रिलीयन डॉलर बद्दल कोणी बोलत असेल पण शिक्षणाबद्दल बोलत नसेल हे गृहीत धरा की ते तुम्हाला वेड्यात काढत आहेत. त्याचबरोबर यावेळी सिसोदियांनी म्हटलं जर या मुलांना चांगलं शिक्षण देता येत नसेल तर जुमले बांधूनच मतदान मागत असतील असा हल्लाबोल त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. मी देखील एका शिक्षक पेशा असलेल्या कुटुंबातून आलो आहे. उत्तर प्रदेशातील एका गावातून मी आलो, मी पुढे शिक्षण घेऊन दिल्लीत आलो, मंत्री झालो, अरविंद केजरीवालांनी मला शिक्षणमंत्री पदी काम करण्याची संधी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळे मास्तर व आ. रोहीत पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

सिसोदियांनी रोहित पवारांचं केलं कौतुक
—————————————-
रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल. रोहित पवार यांना जनतेने गमावू नये. त्यांच्यासारखा नेता तुम्हाला मिळाला आहे त्यांना गमावू नका. रोहित पवार पुर्ण ताकतीने शिक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, ते आताच इतका प्रयत्न करतात तर विचार करा रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल, ते शिक्षणासाठी किती काम करतील. या आमदाराला कधी गमावू नको, आमदार रोहित पवार हे खूप कामाचे आहेत, चांगला माणूस आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.


Post Views: 27
error: Content is protected !!