


बांधखडक येथे अस्थी विसर्जित एवजी वृक्षरोपण करत दिला सामाजिक संदेश
जामखेड प्रतिनिधी
प्रियजनांचे निधन ही नक्कीच दु:खद घटना असते; पण त्या दु:खातही सामाजिक भान ठेवत समाजाला संदेश देण्याची जाणीव दाखवली आहे. ती बांधखडक येथिल येथील केशव आण्णा वनवे यांनी. बांधखडकचे सलग तीन वेळा बिनविरोध राहिलेले सरपंच व ज्येष्ठ भाजपा नेते समाजसेवक हिरालाल नाना वनवे यांचे निधन झाले त्यानंतर अंत्यविधी झाला. मात्र त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी अस्थी विसर्जन न करता तिथेच शेजारी खड्डा खणून आपल्या चुलत्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले.

स्वर्गीय भाजपचे जेष्ठ नेते समाजसेवक हिरालाल नाना वनवे यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते बांधखडक गावचे बिनविरोध सलग तीन वेळा सरपंचपदी राहिले आहेत. विषेश म्हणजे चार भावंडांचे एकत्र कुटुंब असा परिवार आहे. त्यांनी राजकारणा सोबतच शेती व्यवसायात देखील आपला ठसा उमटवून डाळिंब, पेरू व लिंबू या फळबागांसह ऊस शेती सह आदर्श शेती उभी केली आहे. राजकारणाची आवड असल्याने भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य म्हणुन चाळीस वर्षापासून गावाचे आपल्या कुटुंबासारखे राजकारण केले.

विषेश म्हणजे स्वतःचा पुतण्या राजकीय वारसदार म्हणून केशव (अण्णा) वनवे यांना राजकारणात व उद्योगधंद्यात स्थिरस्थावर केले. गावावर चाळीस वर्षापासून एक हाती वर्चस्व ठेवले विरोधकांसह गोरगरीब ऊसतोड कामगार यांच्यासाठी अहोरात्र उपलब्ध असणारी व्यक्ती म्हणजेच हिरालाल नाना वनवे यांचे नाव पंचक्रोशीत परिचित आहे. शिक्षण आरोग्य शेती व अध्यात्मिक क्षेत्रात खूप चांगले काम केले आहे.
हिरालाल वणवे यांचे नुकतेच काही दिवसापूर्वी निधन झाले होते. मात्र अंत्यविधी नंतर कुटुंबाने दुःखद प्रसंगातही समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्या कुटुंबाने त्यांचे अस्थी विसर्जन न करता स्वतःच्या शेतात एक रक्षा टाकून एक वटवृक्ष लावून वृक्षांचे महत्त्व या वाढत्या तापमानास किती गरज आहे हे दाखवून दिले.

अस्थी विसर्जनादरम्यान केशव आण्णा वणवे म्हणाले की, अस्थी विसर्जन पाण्याच्या ठिकाणी करावे अशी प्रथा आहे. त्यामुळे मनःशांती मिळते, असे म्हटले जाते; मात्र आमचे चुलते हिरालाल वणवे यांच्या स्मरणार्थ झाड लावून त्या झाडाची उत्तम देखभाल करून त्या झाडाची सावली सर्वांना मिळावी, तसेच त्यांची कायम आठवण स्मरणात राहील असे सांगितले.








