

खर्डा रोडवर उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली : पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने आजीचा वाचवला जीव!
जामखेड प्रतिनिधी | २ मे २०२६
तीव्र उन्हामुळे उष्माघाताच्या तक्रारी वाढत असताना जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एका वृद्धेची तब्येत अचानक बिघडली. स्थानिक पत्रकार श्वेता गायकवाड व डॉ. लाड यांच्या वेळीच तत्परतेमुळे तिचा जीव वाचला.
जामखेड तालुक्यातील साकत येथील सरुबाई पूलवळे (वय ७०) राहणार साकत तालुका जामखेड या वृद्धेची तब्येत शनिवारी दुपारी १.१५ वाजता कडाक्याच्या उन्हात खर्डा-भूम रोडवर बिघडली. त्या आपल्या मुलासोबत दुचाकीवरून भूम तालुक्यातील वरूड गावाकडून साकत गावी (खर्ड्यामार्गे) जात होत्या. भूम रोड किल्ला परिसर रस्त्यावर अचानक चक्कर येऊन त्या पडल्या आणि उलट्या होऊ लागल्या. काही क्षण त्या बेशुद्ध झाल्या.

ठराविक क्षणी पत्रकार श्वेता गायकवाड यांच्या नजरे लागल्या. त्यांनी तात्काळ डॉ. लाड यांना फोन करून ॲम्बुलन्स बोलावली. डॉ. लाड घटनास्थळी धाव घेतले आणि सरुबाईंची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. लिंबूपाणी देऊन उष्माघाताचे निदान केले.

डॉक्टरांचे महत्त्वाचे आवाहन
डॉ. लाड म्हणाले, “उन्हाची तीव्रता वाढली आहे. उष्माघात टाळण्यासाठी जास्त पाणी प्या, घराबाहेर जाणे टाळा आणि सायंकाळीच बाहेर पडा.” उपस्थितांनी डॉक्टर व पत्रकारांचे कौतुक केले. अशी सामाजिक तत्परता प्रेरणादायी आहे. उन्हाळ्यात आरोग्य विभागाने जागृती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.








