


बावी येथे वादळी वाऱ्याचा कहर, तीन गायींचा मृत्यू , फळबागांचे नुकसान
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील बावी गाव व परिसरात शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. वादळामुळे लाईटचा करंट गायीच्या शेडमध्ये उतरला यात तीन गायी जागीच मृत्यूमुखी पडल्या तर मालक थोडक्यात बचावले त्यांनाही जोरदार करंट बसला शेकडो झाडे उन्मळून पडल्याने लिंबोणीच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

तालुक्यातील बावी येथील पवन जाधव यांच्या शेडमध्ये वादळामुळे वीजेचा करंट उतरला यात तीन गायी मृत्यूमुखी पडल्या तसेच पवन जाधव यांना जोरदार वीजेचा करंट बसला तेही चक्कर येऊन पडले तोंडातून रक्त आले. शेजारच्या लोकांनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. सध्या त्यांची तब्येत धोक्याबाहेर आहे धोका टळला आहे. तसेच वादळामुळे परिसरातील लिंबोणीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झाडे उन्मळून पडले आहेत. सचिन मुरूमकर, बयाजी पवार, दत्ता कारंडे, अभिमान पवार, मधुकर पवार यांच्या बागेचे नुकसान झाले आहे.

शेतकरी सचिन मुरूमकर म्हणाले, “१० वर्षे मेहनत करून लिंबोणीची बाग उभी केली. १० मिनिटांच्या वादळात सगळी झाडे उन्मळून पडली. लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडणार?” पुढील २ दिवस अहिल्यानगर जिल्ह्याला वादळी वारा व विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी फळबागांना आधार द्यावा, काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करून लवकरात शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे आधीच शेतकरी दुष्काळ ने जेरीस आला आहे दुबत्या गाया मृत्युमुखी पडल्या काही शेतकर्यांच्या लिंबोणीच्या बागा भूईसपाट झाल्या आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांनी जीवन कसे जगावे. प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करावेत
(माजी सरपंच निलेश पवार)








