Home ताज्या बातम्या शितल कलेक्शनच्या ‘मान्सून महाबचत सेल’ला दि २० जुलै पासून सुरवात

शितल कलेक्शनच्या ‘मान्सून महाबचत सेल’ला दि २० जुलै पासून सुरवात

शितल कलेक्शनच्या ‘मान्सून महाबचत सेल’ला दि २० जुलै पासून सुरवात

२० जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान ग्राहकांसाठी आकर्षक सवलतींची पर्वणी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या शितल कलेक्शनतर्फे मान्सून निमित्ताने ‘मान्सून महाबचत सेल’ चे आयोजन करण्यात आले असून, या सेलमध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलतींचा लाभ मिळणार आहे. ही विशेष ऑफर २० जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार असून, संपूर्ण कुटुंबाच्या खरेदीसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

या महाबचत सेलमध्ये फ्रेश स्टॉकवर तब्बल २५ टक्के सूट तर सेल स्टॉकवर ५० टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे दर्जेदार कपडे आणि फॅशन वस्तू अत्यंत किफायतशीर दरात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे.

महिला, पुरुष, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक अशा संपूर्ण कुटुंबासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे रेडिमेड कपडे, फॅशनवेअर आणि इतर आकर्षक वस्तूंचा मोठा संग्रह शितल कलेक्शनमध्ये उपलब्ध असून, उत्कृष्ट गुणवत्ता, परवडणारे दर आणि ग्राहकाभिमुख सेवा ही या संस्थेची खास ओळख आहे.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अधिकाधिक बचत करता यावी, या उद्देशाने ही विशेष सवलत योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जामखेड व परिसरातील नागरिकांनी या ऑफरचा लाभ घेऊन आपल्या आवडीच्या वस्तू कमी दरात खरेदी कराव्यात, असे आवाहन शितल कलेक्शनचे सागर अंदुरे यांनी केले आहे.

शितल कलेक्शन, नगर रोड, जामखेड येथे सोमवर दि २० जुलै पासून हा महाबचत सेल सुरू होणार आहे. येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध असुन अधिक माहितीसाठी 88050 63611 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शितल कलेक्शनच्या वतीने करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!