
गटशिक्षणाधिकारी अधिकारी बाळासाहेब धनवे मुळे शैक्षणिक दर्जा सुधारतोय -न्यायाधीश सत्यावान डोके
बावीस वर्षाच्या काळात जामखेड सह शासकीय कार्यालयांमध्ये खुप बदल झाले आहेत. शाळांच्या बाबतीत देखील सुधारणा होत आहे. गटशिक्षणाधिकारी धनवे साहेब हे देखील स्वतः शिक्षक पदावरून गटशिक्षणाधिकारी झाले आहेत. ज्या शिक्षकांचे काम चांगले त्यांचे कैतुक करतात मात्र कामात कसूर करणार्यांवर देखील कारवाई करतात. गटशिक्षणाधिकारी अधिकारी बाळासाहेब धनवे मुळे शैक्षणिक दर्जा सुधारतोय असे मत न्यायाधीश सत्यावान डोके यांनी व्यक्त केले.

जामखेड पंचायत समिती शिक्षण विभागात न्यायाधीश डोके साहेब यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या बरोबरच्या जुन्या मैत्रीला उजाळा दिला यावेळी पत्रकार नासीर पठाण, सुदाम वराट, मोहिद्दीन तांबोळी, अविनाश बोधले, सुजीत धनवे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश डोके यांचा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी सन्मान केला यावेळी बोलताना न्यायाधीश डोके म्हणाले की, गटशिक्षणाधिकारी व माझी मैत्री मी वकील व ते गुरूजी असतानाची आहे. आम्ही दोघांनी पत्रकारिता छंद जोपासला होता. आम्ही दोघेही कष्टातून शिकलो. आम्ही दोघे जिल्हा परिषद शाळेत घडलो आमचा पाया मजबूत झाला आहे याचा फायदा आजही होत आहे. आपल्या तालुक्याला आपल्यातील अधिकारी मिळाले हे आपल्या तालुक्याचे भाग्य आहे. यामुळे तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली आहे.

बाळासाहेब धनवे सारखा सिंघम अधिकारी आपल्या तालुक्याला लाभणे हे आपले भाग्य आहे. काम करणाऱ्या शिक्षकांवर कौतुकाची थाप पडत आहे तर कामचुकार शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत कारवाई होत आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ता वाढीस लागली आहे.

Post Views: 44
error: Content is protected !!