एस.टी बस व चारचाकी वाहनाच्या भिषण आपघात दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
देवदर्शनावरुन परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला
जामखेड प्रतिनिधी
जामखेड खर्डा रोडवरील पाच कीमी अंतरावरील पेट्रोलपंपा जवळ देवदर्शनाहून परतणाऱ्या तरुणांच्या चारचाकी वाहन व एस टी बसच्या झालेल्या भिषण आपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आसुन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अक्कलकोट व तुळजापूर येथुन देवदर्शन करुन पततत आसताना जामखेड जवळ हा भिषण अपघात झाला आहे. आपघातील पाचहीजण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावचे रहिवासी आहेत.
यामध्ये विजय गंगाधर गव्हाणे, वय 24 वर्षे, पंकज सुरेश तांबे, वय 24 वर्षे, दोघे रहाणार वडगाव गुप्ता ता. नगर हे मयत झाले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव डेपोची एम 09. एफ.एल 1027 या क्रमांकाची शिर्डी हैद्राबाद ही बस बस चालक सचिन विष्णू राऊत हे प्रवाशांना घेऊन हैदराबाद कडे चालले होते. तर अक्कलकोट व तुळजापूर येथुन देवदर्शन करुन पाच तरुण चार चाकी वहाण क्रमांक एम एच 16 ए. टी. 6492 या गाडीने आपल्या नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावी चालले होते.
यावेळी सोमवार दि १० रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास या एस टी बस व चारचाकी वहानाची जामखेड खर्डा रोडवरील पाच कीमी अंतरावरील पेट्रोलपंपा जवळ समोरासमोर भिषण धडक झाली. यानंतर आपघातील पाच जखमींना तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले होते. मात्र रस्त्यातच विजय गंगाधर गव्हाणे वय 24 वर्षे व पंकज सुरेश तांबे वय 24 दोघेही रा. वडगाव गुप्ता या दोघांचा मृत्यू झाला. तर मयुर संतोष कोळी वय 18, सचिन दिलिप गीते वय 30 व अमोल बबन डोंगरे वय 28 रा तिघे राहणार वडगाव गुप्ता ता. नगर हे तीन जण गंभीर जखमी झाले असल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती समजताच रात्रीच्या सुमारास जामखेड पोलीस स्टेशनचे सपोनि गौतम तायडे, पो कॉ. देविदास पळसे, हनुमंत अडसुळ, डीगंबर भोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात नेण्यात मदत केली. या अपघातात दोन मयत व तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात एकाच गावातील दोघांचा मृत्यू झाला असल्याने वडगाव गुप्ता गावावर शोककळा पसरली आहे.
यानंतर बस चालक सचिन विष्णू राऊत यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली आहे. याबाबत सध्या जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here