अमर चाऊस यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारगट अल्पसंख्याक अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कट्टर समर्थक व आ. रोहित पवार यांचे खंदे समर्थक अमर चाऊस यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारगटच्या अल्पसंख्याक अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच अहमदनगर राष्ट्रवादी भवन येथे बैठक पार पडली या बैठकीला अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, दादाभाऊ कळमकर, अभिषेक कळमकर, शौकत भाई तांबोळी, जिल्हाअध्यक्ष आथर खानसमीर भाई पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अल्पसंख्याकचे जिल्हास्तरीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली जामखेड तालुक्याचे नान्नज येथील रहिवासी अमर भाई चाऊस अल्पसंख्याक अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी अमर चाऊस यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब जयंत पाटील, युवकांचे आमदार रोहित (दादा) पवार यांचे आभार मानले. माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडेल तसेच पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी आणि माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थक ठरेल. दिन दुर्बल गरीब लोकांना आमदार रोहित (दादा) पवार यांच्यामार्फत त्यांचे प्रश्न सोडू आसे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here