सुंदर (काका) देशमुख यांच्या कडुन ३२ मन सिंहासनासाठी ६५ हजारांची देणगी
जामखेड प्रतिनिधी
श्री संभाजीराव भिडे गुरूजींनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेच्या माध्यामातून जे सुवर्ण सिंहासन स्थापन करण्याचा संकल्प केला आहे त्यानुसार ईश्वरी कार्यात खारीचा वाटा म्हणून जामखेड येथिल धारकरी सचिन देशमुख यांचे वडील सुंदर काका देशमुख यांनी त्यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार रुपये देणगी दिली आहे.
जामखेड येथील धारकरी सचिन देशमुख यांचे वडील सुंदर काका देशमुख यांनी आज गुरुवार दि २२ फेब्रुवारी रोजी ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांनी आपली पासष्टी साजरी न करता आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरूजींनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेच्या माध्यामातून जे सुवर्ण सिंहासन स्थापन करण्याचा संकल्प केला आहे त्या ईश्वरी कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा आजच्या या शुभ दिनी प्रयत्न केला.
शिवछत्रपतींनी ज्या कठीण परिस्थितीशी दोन हात करत जे सुवर्ण सिंहासन निर्माण केले होते, तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. अशा वेळी हे सिंहासनच हिंदु समाजात वीरश्री निर्माण करेल आणि हिंदुना पुन्हा एकदा हिंदवीस्वराज्य स्थापना करण्याची प्रेरणा देईल. आणि तेच सिंहासन हिंदवी स्वराज्य स्वप्नपूर्ती चे आणि तेच ३२ मन ( १२८० किलो) सुवर्ण सिंहासन श्री रायगडावर पुनर्स्थापित करण्याकरता रू ६५ हजारांचा कर्तव्य निधी चा धनादेश या ईश्वरी कार्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड चे पांडुराजे मधुकर भोसले यांच्याकडे आदरणीय श्री सुंदर (काका) देशमुख व देशमुख परिवार यांनी सुपूर्द केला.









