घरकुलाचे अनुदान वाढवण्यासाठी आधुनिक लहुजी सेना जामखेडच्या वतीने तहसील कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन
जामखेड प्रतिनिधी
सर्वसामान्य व गरीबांच्या विविध मागण्यांसाठी आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घरकुल योजनांचे अनुदान वाढवून देण्याची मागणी केली. यावेळी या धरणे आंदोलनास विविध पक्षांच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा देण्यात आला. आखेर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या लेखी अश्वासनानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त असणाऱ्या घरकुल योजने मध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंत आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना आहेत. या सर्व घरकुल आवास योजनेचे ग्रामिण व शहरी भागात १ लाख २० हजार व शहरी भागाकरिता २ लाख ४० हजार या प्रमाणे देण्यात येते परंतु आजच्या महागाईच्या काळात एवढ्या कमी प्रमाणाच्या नीधीमध्ये गोरगरिबांची घरकुल योजना कशी पर्ण होणार त्यामुळे वरील सर्व योजना करीता केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी अनुदान मर्यादा वाढवून ग्रामिण व शहरी भागात सरसकट १० लाख रु अनुदानाची मर्यादा वाढवून देण्यात यावी. तसेच डोणगाव ता. जामखेड येथील (ड) ची घरकुल यादी तात्काळ मंजुर करुन गोरगरिबांना घरकुल देण्यात यावे आशा विविध मागण्या या धरणे आंदोलनात करण्यात आल्या. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर लवकरच धरणे आंदोलनाचे रूपांतर महामोर्चात करण्यात येईल. तसे आम्ही रस्त्यावर उतरुन महाराष्ट्रात आंदोलने करु याचे परीणाम अधिकार्यांना भोगावे लागतील आसा इशारा देखील धरणे आंदोलना दरम्यान आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.
यानंतर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली व आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले की २०१८-१९ मध्ये जो सर्वे झाला याबाबत चुकीच्या पद्धतीने अपात्र लाभार्थी ठरले आहेत त्या लाभार्थींना राज्य सरकारच्या पर्यायी योजनान मधुन लाभ देऊ यासाठी पुढील आठवड्यात लाभार्थींनी परीपुर्ण प्रस्ताव पंचायत समितीमध्ये दाखल करावेत तसेच इतर योजनांचा देखील आम्ही लाभ आम्ही नागरिकांना देऊ आसे आश्वासन दिले. यानंतर सदरचे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापक अध्यक्ष नगिनिताई सोमनाथ कांबळे, जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव फुले, जामखेड तालुका अध्यक्ष रविंद्र डाडर, राज्य प्रवक्ते लक्ष्मण शिरसागर राज्य सल्लागार ॲड अजय कांबळे युवा नेते मृनालभैय्या कांबळे धाराशिव जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ हनमते महेश देडे सिद्धांत डाडर युवक प्रदेश अध्यक्ष जनहित संघर्ष, लहुजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष अहमदनगर लखन मिसाळ, आधुनिक लहुजी सेना तालुका उपाध्यक्ष आशोक वाल्हेकर पाटोदा तालुका अध्यक्ष उमेश क्षीरसागर, आधुनिक लहुजी सेना ता. अध्यक्ष कर्जतचे लखन जगताप, सुनिल नवगीरे बाळासाहेब कांबळे बाळासाहेब खवळे बाळासाहेब साठे प्रविण गायकवाड बाबासाहेब मोरे कृष्णा पुलावळे आनिल जावळे सुर्यकांत सदाफुले. यांच्या सह आनेक कार्यकर्ते या धरणे आंदोलना दरम्यान उपस्थित होते.
यावेळी प्रा मधुकर राळेभात, भाजपा शहर अध्यक्ष पवनराजे राळेभात, अमित जाधव, अमित चिंतामणी, शहाजी (काका) राळेभात, गफ्फारभाई पठाण, डोणगाव चे सरपंच आमोल उर्फ आण्णा यादव यांनी उपोषणास्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.