शिक्षण विभागाचे चांगले काम समाज्यापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यात गुणवत्ता, शाळा व शिक्षकांच्या उपक्रमात जामखेड तालुका अघाडीवर आहे. यासाठी मी शिक्षकांना प्रोत्साहन दिले व पत्रकारांनी देखील प्रसिद्धी दिली. शिक्षण विभागाचे चांगले काम समाज्यापर्यंत पोहोचवण्याचे काम जामखेड तालुक्यातील पत्रकार करतात असे मत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी पत्रकारांच्या सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले.
पंचायत समितीची शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्या होता. यावेळी विस्तार अधिकारी सुरेश मोहिते, केशव गायकवाड, केंद्र प्रमुख विक्रम बडे व नवनाथ बडे, शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, विश्वस्त मुकुंद सातपुते, शिक्षक नेते नारायण राऊत, शिक्षक नेते राम निकम, वरिष्ठ सहाय्यक बाळासाहेब गांगर्डे, नवनाथ बहिर, साहित्यिक गोकुळ गायकवाड सर, कीसन वराट, अनिल आष्टेकर, संतोष डमाळे, विजय जाधव, एकनाथ चव्हाण, काव्या कात्रजकर, रमेश निमसेसह आदी मान्यवर व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे पुढे म्हणाले की नुकतीच मा. न्यायालयाच्या कमिटीने प्रत्येक शाळेवर जाऊन तपासणी केली, त्यांनीही तालुक्यातील शाळेची स्वच्छता व गुणवत्ता याविषयी समाधान व्यक्त केले. कापसेवस्ती सारख्या शाळेवरील मुले 43 चा पाढा म्हणतात ही अभिमानास्पद बाब आहे.
राम निकम सर व पत्रकार लियाकत शेख यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी केशव कोल्हे सर व अरुण मुरुमकर यांनी पालकांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले त्या बद्दल त्यांचा सत्कार जामखेड येथील पत्रकारांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण राऊत यांनी केले.