पवार परिवाराच्या वतीने संक्राती निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जामखेड प्रतिनिधी

नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जामखेड नगर परिषदेच्या माजी सभापती राजश्री पवार व युवक नेते मोहन पवार यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे संक्राती निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित माहिलांनी एकमेकींना संक्रांत वाणाचे व तिळगुळाचे वाटप करण्यात आले.
काल दि. २१ जानेवारी रोजी जामखेड शहरातील संतोषी माता मंदिरा शेजारील आपल्या निवासस्थानी प्रभाग क्र. ९ व परिसरातील महिलांसाठी मोहन पवार यांच्या वतीने संक्राती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमासाठी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. यावेळी राजश्रीताई पवार व महिलांनी एकत्र येत एकमेकींना हळदी कुंकू, तिळगुळ व वाणाचे वाटप करत मोठा आनंद लुटला. यावेळी राजश्रीताई पवार व मोहन पवार यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार मानले.


जामखेड नगर परिषदेच्या माजी सभापती राजश्री पवार व युवक नेते मोहन पवार यांच्या वतीने दरवर्षी मकर संक्रांती, भाऊबीज, गणेश उत्सव असे विविध सण उत्सव, विविध क्षेत्रात यश मिळविलेले विद्यार्थी व खेलाडू यांचे सन्मान व विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या मंडळाचे सन्मान सोहळे आयोजीत करत असतात. त्यांनी आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे करून निवडणूकीत दिलेल्या अश्वासनाची पुर्ती करून नागरिकांचा मिळविलेला विश्वास यामुळे मोहन पवार व राजश्रीताई पवार यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here