समित मोरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण
रत्नदीप शैक्षणिक संकुलाचा अनोखा उपक्रम
जामखेड प्रतिनिधी
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समित भास्कर मोरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर शुभारंभ, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच यावेळी रत्नदीप शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी दोन आत्याधुनिक अतिरिक्त कॉलेज बस देखील उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे पाटील, सेक्रेटरी डॉ. सौ. वर्षा मोरे पाटील, ग्रामीण रुग्णालय जामखेडचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज शिंदे, तालुका कृषी मंडल अधिकारी सौ. हिरडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएएमएस, बीएएमएस, फार्मसी नर्सिंग कॉलेज मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी रत्नदीप शैक्षणिक संकुलात औषधी वनस्पतीचें रोपन करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी – विद्यार्थीनी प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त करून वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेडचे प्राचार्य डॉ. सर्फराज खान, रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदीप सांगळे, रत्नदीप फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुग्रीव घोडके, डॉ. नितीन मडावी, डॉ.सौ. स्वाती मडावी, प्रा.डॉ.झेबिया शेख, डॉ.गफ्फार शैख, डॉ.संजय पोपळे, डॉ दिपाली सांगळे, कु.हर्षदा जेवेन, कु.सोनाली मखर, कु मोनिका कांडे, कु.तब्बसुम शेख, रवींद्र ढवळे, रोहित राळेभात, अशोक पवार, जीवन पवार, धनराज डफळ आदी उपस्थित होते. रत्नदीप शैक्षणिक संकुलातील रत्नदीप फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी चि. महादेव शेंडगे, कु. प्राजक्ता जानराव, रत्नदीप बीएचएमएस कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. अंशिता चौभै, चि.समर्थ कर्पे, रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे कु.भावना इंगळे, चि.रवी घुले, रत्नदीप नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.वानखेडे आदी विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील, सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांचेसह श्री.कुंदन झा, प्रा. महादेव मोरे, श्री.नामदेवराव राळेभात, नव नियुक्त पी. एस.आय सौ. गायत्री राळेभात,श्री.भुषण राळेभात,रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सरफराज खान, रत्नदीप नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या सौ. प्रज्ञा पुजारी, डॉ.सौ.झेबिया शेख आदींनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. यावेळी सौ.गायत्री भुषण राळेभात यांची पी.एस.आय पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना संस्थेच्या सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील म्हणाल्या की रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेमार्फत नेहमी नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रम राबवून दिशादर्शक उपक्रम राबविण्यात येतात. आज रत्नदीप संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समित मोरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नदीप शैक्षणिक संकुलातील कर्मचाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून आभार मानले. तसेच प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविले पाहिजेत असा आशावादही डॉ.सौ.वर्षा मोरे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here