जामखेडचे सुपुत्र डॉ. सूरज काशीद यांची सुपरस्पेशालिटी डी. एम कार्डिओलॉजी आभ्यासक्रमासाठी निवड
जामखेड प्रतिनिधी
जामखेड चे सुपुत्र डॉ. सूरज काशीद यांची देशपातळीवर नुकत्याच झालेल्या सुपर स्पेशालिटी नीटमधून राजाराजेश्वरी मेडिकल कॉलेज (बेंगलोर) या सुपर स्पेशालिटी कार्डियोलॉजी सेंटरमध्ये सुपर स्पेशालिटी डी. एम. कार्डिओ लॉजीसाठी निवड झाली आहे.
जामखेड सारख्या ग्रामीण भागातून व नगर दक्षिण भागातून प्रथमच सुपर स्पेशालिटी डी. एम. कार्डिओलॉजी अभ्यासक्रमासाठी डॉ. सुरज काशीद यांची निवड झाली आहे. ते जामखेड येथील प्रसिद्ध डॉ. सुरेश व डॉ. विद्या काशीद यांचे चिरंजीव आहेत. तसेच डॉ. कल्याणराव काशीद यांचे नातू व नगर येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप बागल व ॲड. बाळासाहेब बागल यांचे भाचे आहेत. डॉ. सूरज काशीद यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे नगरवाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. ते डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथून एम. बी. बी. एस. उत्तीर्ण झाले. त्यानंतर एमडी मेडिसिन ते ए. सी. पी. एम. कॉलेज (धुळे) येथून उत्तीर्ण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here