कल्याण-नगर महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहनांची एकमेकांना धडक, ८ ठार
महाराष्ट्रात रविवार हा अपघातवार ठरला, एकुण २१ जणांचा मृत्यू
पुणे: कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. अपघातात तब्बल ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर येते. ट्रक पिकअप आणि रिक्षा यांच्या धडकेत हा विचित्र अपघात झाला आहे. ट्रक पिकअप आणि रिक्षा यांच्यात तिहेरी झालेल्या विचित्र अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूर, अहमदनगर नंतर पुण्यातही रविवारी दुर्घटना घडली आहे या मध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या आपघातात एकुण २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
डिंगोरे येथील अपघाताची ही माहिती समजतात ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांकडून स्थानिकांसह मदत कार्य चालू असल्याचे पुढे आले आहे. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस करत असून अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ओतूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले आहेत.
मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती,पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश. या अपघातातील मृतांची एकूण ची संख्या आठ आहे. यात पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. गणेश मस्करे ( वय ३०), कोमल मस्करे ( वय २५ वर्ष ) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नवे अद्याप समोर आली नसून या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार हा अपघात साडे दहानंतर आणि अकराच्या दरम्यान घडली आहे.
महाराष्ट्रात रविवार हा अपघातवार ठरला, एकुण २१ जणांचा मृत्यू
रविवारी सकाळी नागपूरमधील सोलार कंपनीत स्फोटकांचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पुणे नाशिक महामार्गावर देखील अपघात होऊन कारमधून प्रवास करणाऱ्या ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. आता, पुणे जिल्ह्यात देखील नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एक कुटुंब संपलं आहे.