

होम मिनिस्टरच्या धर्तीवर महिलांसाठी आयोजित केलेल्या आनंदमेळा कार्यक्रम संपन्न
जामखेड प्रतिनिधी
सोनी मराठी आयोजित होम मिनिस्टरच्या धर्तीवर महिलांसाठी आनंद मेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात व सौ. सुनिताताई मधुकर राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले तर नगरसेवक मोहन पवार, राजश्रीताई पवार, यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

यावेळी पाडळीचे सरपंच बाळासाहेब खैरे, बाळासाहेब वाघ, दत्तात्रय तोरडमल, उमेश माळवदकर, महावितरणचे बलभीम जावळे, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, सोनी टीव्हीचे अक्षय बोरूडे, चंद्रकांत कल्हारे, उमेश पवार, विशाल पवार, सहादूर यादव आदी मान्यवरांसह महिला, पुरुष व लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी घेण्यात आलेल्या विविध खेळांमध्ये रेश्मा समुद्र, सुमन समुद्र, संगीता तोरडमल, मनिषा भोंडवे, कनक सोनवणे या महिलांनी बक्षिसे पटकावली. तसेच उपस्थित महिलांनी, मुली व नागरिकांनी या आनंद मेळ्यातील खेळांचा मोठा आनंद लुटला. जामखेड शहर विशेषतः प्रभाग क्रमांक ९ मधील महिला, मुले नागरिक यांच्यासाठी नगरसेवक मोहन पवार हे नेहमीच विविध सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेत असतात.
या कार्यक्रमामध्ये सहभागी व क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांचा मानसन्मान करत असतात. तसेच सर्वरोग निदान, रक्तदाब, रक्तदान, नेत्ररोग तपासणी अशी विविध शिबिरं घेण्यासाठी मोहन पवार हे नेहमीच अग्रेसर असतात. त्याचाच एक भाग म्हणून काल सोनी मराठी आयोजित होम मिनिस्टरच्या धर्तीवर महिलांसाठी आनंद मेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा सर्व महिला व उपस्थितांनी मोठा आनंद लुटला. शेवटी सर्व उपस्थित मान्यवर व सोनी टीव्हीच्या टीमचे मोहन पवार यांनी आभार मानले.


Post Views: 15
error: Content is protected !!