वाघा येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रा.प.सदस्या सह दोघे करणार उपोषण
सोमवार पासून पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषणास बसण्याचा दिला इशारा
जामखेड प्रतिनिधी
गावातील काही व्यक्तींनी वाघा येथील शासकीय जागेत बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. सदरचे अतिक्रमण हटवण्यात यावे. अन्यथा ग्रा.प.सदस्य सौ.अलका श्रीमंत जगदाळे व कांतीलाल श्रीमंत जगदाळे यांनी सोमवार पासून जामखेड पंचायत समिती कार्यालया समोर करणार आमरण उपोषणास बसण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे वाघा गावातील गट नं. ३१३ हा शासकीय नावे गावठाण लगत गट नंबर असून सदर गटाचे एकूण क्षेत्र १=०१ इतके आहे. सदर गटाच्या लगत वाघा ते नान्नज असा शासकीय रस्ता गेलेला आहे. परंतु सदर गटामध्ये दोन दिवसांपूर्वी गावातील काही लोकांनी त्याठिकाणी वैयक्तीक लाभासाठी त्याठिकाणी असलेले झाडे तोडून व खड्डे खोदून, मुरूम खोदून, मजबुत पत्राशेड बांधकाम केले आहे. सदरीत कामासाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक वाघा यांच्या संगणमताने सदर व्यक्तीने अतिक्रमन केलेले आहे.
तसेच ग्रामपंचायत सदरील अतिक्रमना बाबत दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. यापूर्वी सदर गटनंबर मधील ग्रामपंचायत सदस्य यांनी अतिकमन केल्यामुळे मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी सदरील सदस्य यांचे सदस्यत्व रद्द केलेले आहे.
सदरील गट नंबर मधील जागेमध्ये अतिक्रमन झाल्यास भविष्यामध्ये गावातील शासकीय प्रयोजनासाठी जागा उपलब्ध राहणार नाही. पूर्वी सदर गट नंबर मधील जागेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कंपाऊंडसाठी ही जागा ठेवण्याबाबत ग्रामपंचायतकडे मासिक व ग्रामसभा यांचे ठराव झालेले आहेत.
तरीही सदर व्यक्ती यांनी त्याठिकाणी बेकायदेशीर पणे अतिक्रमन उभे केले आहे. त्यामुळे सदर अतिक्रमन तात्काळ हटवण्यात येऊन सदर दोषी व्यक्ती व सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे व सदरील गट नंबर जागेमध्ये भविष्यामध्ये शासकीय प्रयोजनासाठी कायमस्वरूपी आरक्षीत करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची दखल घेतली नाही तर सोमवार दि १८ डिसेंबर २०२३ पासून पंचायत समिती कार्यालया समोर ग्रा.प.सदस्य सौ.अलका श्रीमंत जगदाळे व कांतीलाल श्रीमंत जगदाळे यांनी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here