सोनी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून आनंद मेळा कार्यक्रमाचे आयोजन, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : नगरसेवक मोहन पवार
जामखेड प्रतिनिधी
लोकप्रिय मराठी वाहिनी सोनी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून आनंद मेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या मेळ्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे.
उद्या दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७: ४० वाजता जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील श्री नागेश विद्यालयाच्या पाठीमागील संतोषी माता मंदिरा जवळ सोनी मराठी टी. व्ही वाहिनीच्या माध्यमातून आनंद मेळा या माहिलांसाठीच्या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ असून या खेळात विजयी स्पर्धकांना सोनी टीव्हीच्या वतीने बक्षिसेही देण्यात येणार आहेत. त्यामुळे जामखेड शहरातील विशेषतः तपनेश्वर भागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे.