जामखेडचे एवन टेक्स्टाइल वस्त्रदालन पुणे-मुंबई सारख्याच दालना प्रमाणे -आ.प्रा.राम शिंदे

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील एवन टेक्सटाईल दालन हे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. एवन टेक्स्टाइल वस्त्रदालन पुणे-मुंबई सारख्याच दालना प्रमाणे आसुन ग्राहकांना आता बाहेरगावी जाण्याची आवश्यकता नाही. अल्पदरात उत्तम दर्जाचे कापडे जामखेड मधिल एवन टेक्सटाईलच्या रूपाने मिळत आहे. असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी भेटी दरम्यान म्हटले आहे.

आमदार प्रा. राम शिंदे यांनी नविन झालेल्या एवन टेक्सटाईल या दालनास सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अमित चिंतामणी, कांतीलाल खिवंसरा, पांडुरंग माने, ज्ञानेश्वर झेंडे, मनोज कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकुमार गोरे, डॉ. गणेश जगताप, मोहन गडदे, मोहन देवकाते, अल्ताफ शेख, एवन टेक्सटाईलचे संचालक साधु (नाना बोराटे) व विनायक राऊत, महेश राऊत, भाग्यश्री राऊत, किरण बोराटे, दत्तात्रय बोराटे तुषार बोथरा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी सांगितले की, जामखेड शहरात भव्य- दिव्य असे एवन टेक्सटाईल दुकान झाले आहे. यामुळे जामखेडच्या वैभवात भर पडली आहे. आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. वै. विठ्ठल (आण्णा) राऊत यांचे कार्य सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी होते. त्यांचे आशिर्वाद मिळणार आहेत त्यांमुळे अल्पावधीतच एवन टेक्सटाईल उंच भरारी घेईल असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला.

एवन टेक्सटाईल हे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे जामखेड परिसरातील लोकांना काय हवे ते राऊत व बोराटे यांनी दुकानाच्या रूपाने दिले आहे. एवन टेक्सटाईल साठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here