सुरेश मोहिते यांचे विस्तार अधिकारी पदोन्नतीनिमित्त सपत्नीक सत्कार…
शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार व निरोप समारंभ संपन्न
जामखेड प्रतिनिधी
तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सुरेश मोहिते मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली. याबद्दल तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने सुरेश मोहिते सर यांचा शाल, फेटा, श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सुरेश मोहिते सर व नवनिर्वाचित केंद्रप्रमुख नवनाथ बडे यांची पदोन्नती झाली. या निमित्ताने या दोन्ही अधिकाऱ्यांचा गुरुवारी (दि.३०) तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या दोन्हीही अधिकाऱ्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजाच्या शैलीतून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली, असे गौरवोद्गार याप्रसंगी प्रताप पवार सर यांनी काढले.

याप्रसंगी आज शाळेमध्ये नुकतेच शासकीय सेवेतून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले मोहन खवळे सर यांनी खास मुला मुलींच्या
मनोरंजनासाठी कळसुत्री बाहुली नृत्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जामखेड बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश मोहिते सर, जामखेड केंद्राचे केंद्रप्रमुख नवनाथ बडे, मोहन खवळे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र आदे, उपाध्यक्ष धनराज पवार, नगरसेवक मोहन पवार, शिक्षणप्रेमी कुंडल राळेभात, राजेंद्र काटकर, ॲड. शकील शाह, सर्पमित्र शाम पंडित, सौ.दिपाली भवर, अश्विनी वेदपाठक, अर्चना मुकाडे, स्वाती जाधव, अडाले मॅडम आदी मुख्याध्यापिका श्रीम. छाया चौभारे मॅडम व सर्व शिक्षकवृंद मुले,मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप पवार सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन संजय आरेकर सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here