श्रीयूत भुषण नामदेव राळेभात यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी व्हिएतनाम येथे निवड
जामखेड प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे हवामान अद्यावत शेती व जलव्यवस्थापणाचे आधुनिक कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रकल्पांतर्गत स्मार्ट शेती वर आधारित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील आचार्य पदवी (पीएचडी) चे जामखेड चे विद्यार्थी मा. श्रीयुत भुषण नामदेव राळेभात यांची कॅन थो युनिव्हर्सिटी व्हिएतनाम येथे एक महिन्याच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
श्रीयुत मा.भुषण नामदेव राळेभात हे सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी येथे उद्यानविद्या विभागामध्ये भाजीपाला शास्त्र या विषयाचे आचार्य पदवीचे (पीएचडी) शिक्षण घेत आहेत. भुषण यांनी त्यांचे पदवी (B.Sc Horticulture ) चे शिक्षण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे व पदव्युत्तर शिक्षण (M.Sc. Agriculture) हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथुन पूर्ण केले आहे. तसेच भुषण यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदे मध्ये उत्कृष्ट सहभाग नोंदविला आहे. तरी श्रीयुत मा. भुषण नामदेव राळेभात यांचे संपूर्ण विद्यापीठातून व जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here