उपक्रमशील शिक्षक बी. एस शिंदे यांची शरद पवार फेलोशीप इन एज्युकेशन २४ साठी निवड
जामखेड प्रतिनिधी
दिव्यांग मुलांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या नवोपक्रमा साठी श्री नागेश विद्यालय जामखेड येथे येथील उपक्रमशील शिक्षक श्री शिंदे बी.एस.यांची शरद पवार फेलोशीप इन एज्युकेशन साठी निवड झालेली आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप 12 डिसेंबर 2021 पासून दरवर्षी देण्यात येते. या अंतर्गत कृषी साहित्य, शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना फेलोशिप प्रदान करण्यात येते. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन साठी राज्यभरातून 30 फेलोंची निवड केली आहे. त्यांना साठ हजार रुपये फेलोशिप व प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
श्री नागेश विद्यालय जामखेड येथे येथील उपक्रमशील शिक्षक श्री शिंदे बी.एस.यांची शरद पवार फेलोशीप इन एज्युकेशन साठी निवड झालेली आहे. त्यांनी दिव्यांग मुलांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या नवोपक्रमा साठी त्यांची निवड केलेली आहे.










