सावधान! जामखेड मध्ये पकडल्या बनावट शंभर रुपयांच्या नोटा, दोन आरोपींना जामखेड पोलिसांन कडून अटक
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथिल भाजीमंडई मध्ये एकजण बनावट शंभर रुपयांची नोटा देऊन एका वृद्ध महीलेकडुन भाजी विकत घेत आसताना त्या वृध्द महीलेस दिलेल्या शंभर रुपयांच्या नोटा बद्दल संशय आला. सदरची नोट निरखुन पहील्याने ती शंभरची नोट बनावट असल्याचे आढळुन आले. व त्या ठिकाणी आसलेल्या लोकांच्या मदतीने आरोपीस पोलीसांच्या ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडुन एकुण ३४८४० रु बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील भाजी मंडई येथे दि. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी भाजी विक्रेत्या सुशिला सुर्यभान भुकन या ७० वर्षे या भाजी विकत असतानां त्यांचेकडे एक इसम आला व त्याने २० रुपयांचे चने ( ओले हरबरे ) घेतले. यानंतर भाजी विक्रेते सुशीला यांना १०० रु. दराच्या दोन नोटा दिल्या. परंतु नोटाचे कागदावरुन सदर भाजी विक्रेत्या महीलेस संशय आला. तिने सदर इसमास हाक मारुन परत बोलविले व नोटांबाबत विचारपुस केली. मात्र यावेळी तो गडबडल्याने तिचा संशय बळावला. तिने त्या इसमाने दिलेल्या नोटांपैकी एक नोट पाण्यात बुडून पाहीली असात नोटेच्या पाठीमागील रंग उडाल्याचे दिसताच त्या महीलेने आरडाओरडा केला. या नंतर बाजारातील लोक जमा झाले. त्यांनी सदर आरोपीस पकडुन ठेवुन पोलीसांना बोलावले ताबडतोब जामखेड पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले.
त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव मोहीत सुनिल कचरे (वय २१ वर्ष रा. घर नंबर ३०, गल्ली नंबर-२, चिखलठाणा, छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगीतले. त्याच्या कडे १०० रुपये रुपयांच्या ४५ खोटया (बनावट) नोटा मिळुन आल्या. त्याचे डावे खिश्यात २०४० रूपये रोख रक्कम मिळुन आली. त्याचे जवळचे बॅग मध्ये १०० रुपयांच्या ५० खोटया नोटा व रू. १४५० रोख रक्कम मिळुन आली. पोलिसांनी या सर्व बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे सखोल विचारपुस केली आसता त्याने या नोटा त्याचा मेव्हणा (बहीणीचा नवरा ) अक्षय तारोबा पवार रा. फ्लॅट नंबर ४०४, अक्षरबन सोसायटी झाल्टा फाटा, बीड बायपास, छ. संभाजी नगर याचे मदतीने त्याचे झाल्टा फाटा छ. संभाजी नगर येथील घरी छापल्याचे सांगीतले. तसेच त्याचा मेव्हणा हा मोटारसायकल वर पळुन गेल्याचे सांगीतले. यानुसार आरोपी मोहीत याचेकडुन सर्व माल पंचनामा करुन जप्त करण्यात आला. यावरून पोलीस कॉन्स्टेबल दत्तु बेलेकर यांनी शासनाचे वतीने नोंदविलेले फिर्यादी वरुन जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 499/2023 भा.द.वि. कलम 489 (अ) (ब), (क), (ड) 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेत सुरुवातीस एक आरोपीस अटक करण्यात आली होती. मात्र एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे अहमदनगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत विभागाचेउपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे मागदर्शनाखाली व आदेशाने पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलीस पथक तयार करुन ते छ. संभाजी नगर येथे रवाना केले. सदर पोलीस पथकाने फरार आरोपी अक्षय पवार यास छ. संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्याचे कडील रंगीत प्रिंटर पंचनामा करुन जप्त करुन ताब्यात घेतले.
यातील आरोपीना सदर गुन्ह्यात अटक करण्यात येऊन त्यांचे कडुन सदर गुन्हयातील १ नग प्रिंटर, बनावट नोटा, मोटार सायकल, बॅग, रोख रक्कम वैगरे वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्ह्याचा तपास चालु असुन सदर बाबत काही कोणास माहीती असल्यास त्यांनी जामखेड ठाणे फोन नंबर 02421221033, महेश पाटील पोलीस निरीक्षक मो.नं. 8691811411 वर संपर्क करावा असे अवाहन जामखेड पोलीसांकडुन करण्यात आले आहे.