

जामखेडच्या समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये हाडांचे तज्ञ ( एम एस ऑर्थो) डॉ. श्रीनिवास लांब उपलब्ध
जामखेड प्रतिनिधी
जामखेडच्या समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आता हाडांचे तज्ञ ( एमबीबीएस , एम एन ए, एम एस ऑर्थो, डीएनबी ऑर्थो, एफ आय जे आर) डॉ. श्रीनिवास लांब हे २४ तास रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त हाडांच्या रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन समर्थ हॉस्पिटल चे संचालक डॉ भरत दारकुंडे यांनी केले आहे. यावेळी त्यांचा सर्व स्टाफ च्या वतीने सत्कार करण्यात आला.

जामखेड शहरात गेल्या पाच वर्षांपासून सेवेत असलेल्या समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे विविध अजारानवर उपचार केले जातात. याठिकाणी सध्या र्हदयरोग तज्ञ व मधुमेह तज्ञ डॉ अमोल भगत (एम.डी मेडीसीन) म्हणून उपलब्ध आहेत. या हॉस्पिटल मध्ये सर्पदंश, विषबाधा, हार्ट अॅटॅक, अर्धांगवायू सह इतर अजारानवर उपचार केले जातात.

यानंतर या समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नव्याने हाडांचे तज्ञ ( एम एस ऑर्थो) डॉ. श्रीनिवास लांब हे २४ तास रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यांनी एमबीबीएस ची डिग्री जे.जे.हॉस्पिटल मुंबई येथुन घेतली आहे. तर (एम एन ए, एम एस ऑर्थो) हे न्यु दिल्ली येथे केले आहे. (एम.एस. ऑर्थो) भाभा रुग्णालय मंबई येथे झाले आहे.
डॉ. श्रीनिवास लांब यांनी मंबई येथील जे.जे. रुग्णालय ,भाभा रुग्णालय, शताब्दी रुग्णालय तर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय याठिकाणी रुग्णसेवा केली आहे. तसेच त्यांनी रामय्या विद्यापीठ, बैंगलोर या मधुन फीलोशिप मिळवली आहे. या नंतर काही दिवसांपूर्वीच ते जामखेड शहरातील समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये हाडांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध झाले आहे. त्यांना रुग्णसेवेचा अत्तापर्यंन्त बारा वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे आत्ता हाडांच्या उपचारासाठी रुग्णांना नगर कींवा पुण्याला जाण्याची आवश्यकता भासणार नसुन ते सर्व उपचार जामखेड शहरातील समर्थ हॉस्पिटल मध्ये मिळणार आहेत. त्यामुळे गरजु रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन समर्थ हॉस्पिटल चे संचालक डॉ भरत दारकुंडे यांनी केले आहे.


Post Views: 25
error: Content is protected !!