पाडळी येथिल सनराईज शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पाडळी फाटा येथील सनराईज शैक्षणिक संकुलातील स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेज, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व सनराईज इंग्लिश स्कूल मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला..

सनराईज शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे हे आपल्या शैक्षणिक संस्थामधुन वर्षभर विविध सांस्कृतिक व शैक्षणिक तसेच कार्यक्रम, क्रिडा कार्यक्रम करत असतात. आपल्या विविध शाखांमधील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात पुढे जावेत या उद्देशातून घेतलेल्या कार्यक्रमांना विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांचाही चांगला प्रतिसाद असतो.

आज दि. ५ सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त घेतलेल्या या कार्यक्रमात सर्व विदयार्थी व विद्यार्थिनी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन शिक्षक दिन साजरा केला.यावेळी प्राचार्या श्रीमती अस्मिता जोगदंड यांचेसह तिन्ही विभागाचे शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here