कुसडगाव येथील SRPF सेंटरमध्ये मेरी माटी-मेरा देश उपक्रमांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा संपन्न

पोलिस निरीक्षक महेश पाटील व सभापती शरद कार्ले यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ संपन्न

जामखेड प्रतिनिधी

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे उभारण्यात आलेल्या राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रात मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. याचे बक्षिस वितरण समारंभ जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील व जामखेड बाजार समितीचे सभापती पै.शरद (दादा) कार्ले यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ पार पडला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
देशभर यंदा मेरी माटी- मेरा देश या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रम देशभर साजरे होत आहेत. जामखेड तालुक्यातील कुसडगावच्या एसआरपीएफ सेंटरमध्ये विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पोलिस बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कुसडगावच्या दौंड येथे कार्यरत असलेल्या SRPF बटालियनने पोलीस अधीक्षक दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली कुसडगाव प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती. आणि जवानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून एस आर पी एफ च्या कामासंदर्भात आणि शस्त्रांसंदर्भात माहिती देऊन प्रात्यक्षिक दिले व वृक्षारोपणही करत भालाफेक, गोळाफेक,100 मीटर रनिंग, खो खो, हॉलीबॉल, कबड्डी खेळ अशा अनेक स्पर्धांच आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दिलीप खेडेकर, विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील, छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, बापुराव ढवळे, सरपंच राजेंद्र ओमासे, कुसडगावचे सरपंच पप्पू कात्रजकर, अजय सातव, नजिरभाई यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार प्रा राम शिंदे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे व प्रयत्नाने ओसाड माळरान असलेल्या भागात एसआरपी केंद्र वसवले यामुळे हे ठिकाण महाराष्ट्राच्या नकाशावर आले. हे ठिकाण आज जामखेड तालुक्याच्या केंद्रबिंदु ठरतंय .सडगावच्या शासकीय माळरानाचा सर्वसामान्यांच्या हितासाठी वापर व्हावा या उद्देशाने त्याठीकाणी पोलीस ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्याचा निर्णय आमदार प्रा.राम शिंदे यांनी घेतला आणि युध्दपातळीवर पाठपुरावा सुरू केला पण कधी सत्तेत तर कधी विरोधात असल्यामुळे अनेकवेळा अडचणीही आल्या पण शेवटी त्यांच्या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच करत असलेल्या प्रमाणिक प्रयत्नांना यश आल आणि कुसडगावच्या ओसाड माळरानावर पोलीस ट्रेनिंग सेंटरला उभा राहीलं. 2016/17 ला प्रक्रिया सुरू झाली आणि 2023 ला ट्रेनिंग सेंटर सुरू झालं थोडा वेळ लागला पण तरीही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे की शासकीय जमीन सर्वसामान्य आणि शासनाच्याचं उपयोगी आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here