

आरोपीवर कठोर कारवाई करा अन्यथा जिल्हाभर आंदोलन करणार- सुनील साळवे, जिल्हाध्यक्ष आर पी आय आठवले.
जामखेड प्रतिनिधी दि.२८
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्हा व शहर यांच्या वतीने हरेगाव येथे दलित तरुणावर अमानुषपणे मारहाण झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. याघटनेचा दलित समाजात प्रचंड संताप असून मारहाण करणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल.असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी सांगितले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, महिला जिल्हाध्यक्षा आरतीताई बडेकर, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगरसेवक राहुल कांबळे, प्रसिद्धीप्रमुख लोकेश बर्वे, संजय कांबळे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, योगेश त्रिभुवन जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी तालुका उपाध्यक्ष जयराम आंग्रे, महिला तालुकाध्यक्ष कविताताई नेटके पक्षाचे प्रमुख आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे शेळी आणि कबुतरं चोरीच्या संशयावरून शुक्रवारी सकाळी चार मागासवर्गीय तरूणांना त्यांच्या घरातून उचलून नेण्यात आलं होतं. या तरुणांना कपडे काढून झाडाला उलटं लटकवून आरोपी युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे यांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत तरुणांना शेळीची चोरी केल्याबाबतची माहिती वदवून घेण्यात आली. मात्र तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही नगर जिल्ह्यात जिल्ह्यात दलित समाजावर अनेकवेळा हल्ले झाले असून ॲट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी दलित समाजाकडून होत आहे.



Post Views: 23
error: Content is protected !!